शरद पवारांचा अजित पवारांवर विश्वास नाही; केंद्रीय मंत्र्यांचे विधान

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा विश्वास त्यांचा पुतण्या अजित पवार यांच्यावर नाही. त्यामुळे शरद पवार पक्षातील दुसऱ्याच नेत्याला महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेते बनवणार होते. पण ऐनवेळी अजित पवार यांनी धमकी दिल्याने शरद पवारांनी अजित पवारांना विरोधी पक्षनेते बनवले, अशा आशयाचे विधान भाजपा नेते, केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी केले.

काय म्हणाले अजयकुमार मिश्रा?

२०२४च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणीसाठी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा सातारा दौऱ्यावर आले होते. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून त्यांनी अजित पवारांवर टीकास्त्र सोडले. अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांना स्वराज्यरक्षक असे संबोधले मात्र धर्मवीर म्हणण्यास नकार दिला होता. यामुळे वाद पेटला होता. छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी आपले बलिदान दिले. धर्मासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या व्यक्तीला ते धर्मवीर नव्हते म्हणणाऱ्या व्यक्तीवर मी काय टिप्पणी करू, असेही मिश्रा म्हणाले.

(हेही वाचा मुंबईत कुठे कुठे आहेत जोशीमठ?

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here