कोणाचेही सरकार येवो, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) राहिले आहेत, असे सलग ५ वेळा घडले आहे. पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे असे चार मुख्यमंत्री झाले, त्यात एकदा काँग्रेसचा मुख्यमंत्री झाला, एकदा भाजपा-शिवसेना युतीचा, कधी दोन्ही काँग्रेस आणि शिवसेना या महाविकास आघाडीचा तर आता भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी या महायुतीचा मुख्यमंत्री आहे, अशा वेळी उपमुख्यमंत्री मात्र अजित पवारच राहिले आहेत. यावर अजित पवार यांना गर्व वाटत आहे. यावर त्यांनी कोल्हापुरात चंदगडमध्ये जन सन्मान यात्रेच्या सभेत ते बोलले.
(हेही वाचा Assembly Election : उबाठा, शेकापमध्ये रस्सीखेच! इच्छुक उमेदवारांचा प्रचार सुरु, काँग्रेसचाही दावा)
राज्याने मला भरभरून दिले
अजित पवारांनी (Ajit Pawar) राज्यांना पाच वेळा उपमुख्यमंत्री होण्याची संधी दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. मला भरभरून या राज्याने दिलं आहे. आपलं रेकॉर्ड कुणी मोडणार नाही. पाच वेळा उपमुख्यमंत्री झालो. कोण मायचा लाल माझं रेकॉर्ड मोडू शकत नाही. कोण पाच वेळा उपमुख्यमंत्री होणार आहे? माझ्या नशिबी होतं म्हणून मी झालो. जाऊ द्या, त्याचा भाग वेगळा, असे अजित पवार म्हणाले. मुलींचे कौतुक करताना अजित पवारांनी विद्यार्थ्यांचे कान पिळले. ते म्हणाले, बाप बापड्यांपेक्षा महिला चांगलं काम करतात. कारण मी पुरुष आहे, मला माहिती आहे. तुम्ही बघा बारावीचा निकाल बघा. सगळ्यात जास्त मेरीटमध्ये कोण आहे, मुली. मुलं कमी. दहावीचा निकाल काढा. सगळ्यात जास्त मेरीटमध्ये मुली. मुलं कमी, कारण मुलांना इकडं काय चाललंय, तिकड काय चाललंय? ही कशी दिसती, ती कशी दिसती. अरे अभ्यास कर ना. ती कशी दिसती, ती चांगलीच दिसती. तुझं बघ. तू शिकला तर तुला चांगली मिळेल, असेही अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.
Join Our WhatsApp Community