विधानसभेतील जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर Ajit Pawar काय म्हणाले?

147
विधानसभेतील जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर Ajit Pawar काय म्हणाले?
विधानसभेतील जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर Ajit Pawar काय म्हणाले?

लोकसभा निवडणुकीतनंतर महाराष्ट्रात आता विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. महाविकास आघाडी किंवा महायुती यांचा जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप समोर आलेला नाही. मात्र, यासाठी महायुतीने कंबर कसली असल्याचे दिसुन येत आहे. अजित पवारांची (Ajit Pawar) नाशिमधून गुरूवारी जनसन्मान यात्रा सुरु होत आहे. यावेळी जागावाटपासंबंधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला.

(हेही वाचा –Thackeray group Banner: काय आहे हिंदुत्व? ठाण्यात ठाकरे गटाकडून बॅनरबाजी)

अजित पवार म्हणाले की, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ही जनसन्मान यात्रा (Jansanman Yatra) सुरू केली आहे. आजपासून आम्ही जास्तीत जास्त मतदारसंघात जाण्याचा प्रयत्न करत आहोत. महायुतीच्या सरकारमध्ये काम करत असताना महत्त्वाच्या योजना अर्थसंकल्पात आम्ही सादर केलेल्या आहेत. त्याबद्दलची माहिती आम्हाला शेतकऱ्यांना बहि‍णींना, मुलींना, युवा वर्गाला द्यायच्या आहेत. बुधवारी अल्पसंख्यांकांसाठी मार्टीची स्थापना करण्याचा निर्णय मंत्रिमंडळात घेण्यात आला आहे. समाजातल्या प्रत्येक घटकाचा विचार करण्याची आमची भूमिका आहे. शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारधारेतून आम्ही पुढे जात आहोत.” असं त्यांनी स्पष्ट केलं. (Ajit Pawar)

(हेही वाचा –Ceropegia Shivarayina : विशाळगडावर सापडली नवी वनस्पती; शिवाजी महाराजांचे दिले नाव)

महायुतीच्या जागावाटपाबाबत अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, आमच्या तीनही पक्षांकडे ज्या ज्या जागा आहेत त्या त्या जागा त्यांच्याकडे ठेवल्या जातील. पण जर काही सिटींग जागा बदलायच्या असतील तर त्याही प्रकारची तयारी आणि मानसिकता तिन्ही पक्षांनी आणि मित्र पक्षांनी ठेवली आहे. आता लवकरच त्याला अंतिम स्वरूप दिलेले आपल्या पाहण्यात येईल, असं अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी म्हटलं आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.