अजित पवार पहाटेच्या शपथविधीला जाणार, यातही होती पारदर्शकता…पुस्तकात होईल स्पष्ट

राज्यात सत्तांतर घडवून आणण्याचा आमचा प्रयत्न जेव्हा सुरु होता, तेव्हा आमच्यात पारदर्शकता होती. कोण कुणाबरोबर बोलते, कुणाला कोण भेटते हे सर्व आम्ही एकमेकांना सांगत असायचो, या पारदर्शकतेमुळे भाजपचे सरकार येऊ शकले नाही. विशेष म्हणजे पहाटेच्या शपथविधीला अजित पवार जाणार यातही पारदर्शकता होती, म्हणूनच संध्याकाळी सगळे आमदार परत आले, त्यातही बरेच काही ठरले होते, कुणाचे तरी पुस्तक येईल, त्यात स्पष्ट होईल, असे शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले.

राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी ऑफर दिली होती, असे ज्याअर्थी शरद पवार यांनी सांगितले, त्याअर्थी त्यात सत्यता आहे. त्या वेळी आमच्या सर्वांमध्ये पारदर्शकता होती. आम्ही सर्वजण एकमेकांना सांगायचो. मोदींच्या ऑफरबाबतही आम्हाला माहित होते. भाजपाला मात्र हे माहीत नव्हते, म्हणून भाजपचे सरकार येऊ शकले नाही, असेही राऊत म्हणाले.

(हेही वाचा राज्यात सरकार स्थापनेसाठी मोदींनीही दिलेली ऑफर! शरद पवारांचा गौप्यस्फोट)

मोदी मास्क घालत नाही 

देशाचे पंतप्रधान मोदी हे मास्क घालत नाही, म्हणून जनता मास्क घालत नाही, मीदेखील त्यांचे अनुकरण करत आहे, असेही संजय राऊत म्हणाले. राज्यात कोरोना नियमांचे पालन करण्याची गरज आहे. अन्यथा आता रात्रीचे निर्बंध लावण्यात आले आहेत, उद्या दिवसाही निर्बंध लावावे लागतील, त्याच्या आर्थिक व्यवस्था बंद पडेल, असेही राऊत म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here