Maharashtra budget 2022 : लता मंगेशकर संगीत महाविद्यालयासाठी १०० कोटींची तरतूद

109

महाराष्ट्राच्या विधानसभेत उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी राज्याचा 2022-23 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये त्यांनी विविध घोषणा केल्या आहेत. यामध्ये आरोग्य आणि कृषी क्षेत्रावर अधिक जोर देण्यात आला आहे. तसेच अजित पवार यांनी स्वर्गीय लता मंगेशकर यांच्या नावाने संगीत स्मारक स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. मुंबईत कलिना विद्यापीठाच्या परिसरात लता दिनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय आणि संग्रहालय उभारण्यात येणार आहे. याकरता तब्बल 100 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असल्याची घोषणा शुक्रवारी अजित पवारांनी अर्थसंकल्प सादर करताना केली.

थोर समाजसुधारकांच्या नावाने विद्यापीठातील अध्यासनांसाठी 3 कोटी

यासह लता मंगेशकर संगीत महाविद्यालयासाठी 100 कोटींची तरतूदीसह थोर समाजसुधारकांच्या नावाने विद्यापीठात अध्यासने सुरू करण्याचे धोरण सरकारने यापूर्वी सुरू केले आहे. त्यासाठी 3 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती देखील अजित पवार यांनी दिली.

छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी 250 कोटींचा निधी

राज्याच्या विधानसभेत अर्थसंकल्प सादर करण्याआधी अर्थमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन त्यांना अभिवादन केले. स्वराज्यरक्षक संभाजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक स्थापन करण्यासाठी राज्य सरकारकडून 250 कोटींचा निधी देण्यात येत असल्याची घोषणा अजित पवारांनी केली.

(हेही वाचा – राज्यसभेत भाजप होणार आत्मनिर्भर! चार राज्यांतील विजयाचा ‘असा’ होणार फायदा)

मुंबईत उभारण्यात येणाऱ्या महाराष्ट्र भवनासाठी 100 कोटींची तरतूद

मुंबईत कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांच्या निवासाची तात्पुरती सोय व्हावी यासाठी नवी मुंबई इथं महाराष्ट्र भवन उभारण्यात येणार असल्याची घोषणा अजित पवारांनी केली आहे. यासाठी 100 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.