Ajit Pawar : अजित पवार राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांसह शरद पवारांच्या भेटीला; राजकीय घडामोडींना वेग 

193

पावसाळी अधिवेशनाआधी अजित पवार गटाच्या मंत्र्याची  बैठक पार पडली. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या देवगिरी निवासस्थानी ही बैठक पार पडली. या बैठकीनंतर शरद पवार यांना भेटण्यासाठी  उपमुख्यमंत्री अजित पवार, आदिती तटकरे, मंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, छगन भुजबळ वाय बी चव्हाण सेंटरला पोहचले. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

देवगिरीवर झालेल्या बैठकीला  सुनील तटकरे यांनी  मार्गदर्शन केले. बैठकीनंतर  अजित पवारांसह सर्व मंत्री वाय बी सेंटरला पोहचले. बैठकीचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.  या बैठकीसाठी जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड देखील पोहचले आहेत. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादीतील ९ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडल्याचे दिसत आहे. दोन दिवसापूर्वी या मंत्र्यांना खात्यांचे वाटपही करण्यात आले आहे. उद्यापासून विधीमंडळीचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठी अपडेट समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातील नेते खासदार शरद पवार यांच्या भेटीसाठी वाय बी चव्हाण सेंटरमध्ये दाखल झाले आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.

(हेही वाचा Maharashtra Politics : विधानसभा, लोकसभा निवडणुकीत महायुतीला मिळतील ‘इतक्या’ जागा? उदयनराजेंनी सांगितला आकडा)

राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवार यांचा एक गट तर शरद पवार यांचा एक गट, असे राष्ट्रवादीत दोन गट पडले होते. दरम्यान, आता या फुटीनंतर पहिल्यांदाच अजित पवार गटातील नेते शरद पवार यांच्या भेटीसाठी वाय बी चव्हाण सेंटरमध्ये दाखल झाले आहेत.  दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाही खासदार सुप्रिया सुळे यांनी फोन करुन वाय बी चव्हाण सेंटरकडे बोलावले असल्याचे पाटील यांनी सांगितले. आज विरोधी पक्षांची अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बैठक सुरू होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातील स्वत: अजित पवार, मंत्री हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे  हे नेते वाय बी चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार यांच्या भेटीसाठी गेले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.