अजित पवार यांच्यासह बहुसंख्य आमदारांनी शिवसेना-भाजपा युतीला पाठिंबा दिल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. त्यानंतर आता अजित पवार गटाने शरद पवारांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून हकालपट्टी केली असून, अजित पवार पक्षाचे नवे अध्यक्ष असल्याचा प्रस्तावही मंजूर केला आहे.
बुधवारी ५ जुलै रोजी प्रफुल्ल पटेल यांनी बोलावलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत अजित पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष निवड करण्यात आली. त्याशिवाय अजित पवार गटाने निवडणूक आयोगाकडे एका पत्राद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ या निवडणूक चिन्हावरही दावा सांगितला आहे. यासंबंधीचे ४० आमदारांच्या स्वाक्षऱ्यांचे पत्र त्यांनी निवडणूक आयोगाला सादर केले आहे. विशेष म्हणजे निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या पत्रात अजित पवार यांचा राष्ट्रवादीचे अध्यक्ष असा उल्लेख करण्यात आला असून, पत्रावर ३० जून ही तारीख नमूद करण्यात आली आहे.
(हेही वाचा – पाकिस्तानी तरुणीचे भारतात येणे संशयास्पद; देशाच्या सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह?)
शरद पवार गटाकडून कॅव्हेट याचिका दाखल
दरम्यान, आमची बाजू ऐकल्याशिवाय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत कोणताही निर्णय घेऊ नये, अशी मागणी शरद पवार यांनी कॅव्हेटद्वारे निवडणूक आयोगाकडे केली आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगाने दोन्ही बाजुंचे म्हणणे ऐकून निर्णय देणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community