तुम्ही मला मते दिली म्हणजे सालगडी केलंय का?; Ajit Pawar कार्यकर्त्यांवर भडकले

182
Budget 2025 : राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनाची घोषणा, १० मार्चला अर्थसंकल्प सादर होणार
Budget 2025 : राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनाची घोषणा, १० मार्चला अर्थसंकल्प सादर होणार

बारामतीतील (Baramati) एका कार्यक्रमानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांना भेटले. त्यावेळी अजित पवार कार्यकर्त्यांवर भडकलेले पाहायला मिळाले. यावेळी कार्यकर्त्यांनी काही मागण्यांचे पत्र अजित पवार यांना दिले. तशीच बरीच कामे झाली नाही, असे ही पवार यांना सांगितले. त्यावेळी अजित पवार त्यांच्यावर चांगलेच भडकले. ते म्हणाले, तुम्ही मला मते दिली म्हणजे माझे मालक नाही झालात, अशा शब्दात पवारांनी कार्यकर्त्यांना सुनावले.

( हेही वाचा : Vaitarna- Miraroad रेल्वे अपघातात वाढ; वर्षभरात २२५ जणांचा अपघाती मृत्यू

दरम्यान या प्रकरणानंतर मंत्री संजय शिरसाठ यांनी अजित पवारांची (Ajit Pawar) पाठराखण केली. हिवाळी अधिवेशनानंतर अजित पवार परदेशी गेले होते. तिथून परतताच त्यांनी बारामतीतील (Baramati) काही विकासकामांचे उद्घाटन करण्यास सुरुवात केली. यावेळी बारामतीतील मेडद येथील तालुका खरेदी विक्री संघाच्या परिसरात एका नवीन पेट्रोल पंपाचे उद्धाटन अजिप पवारांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी हा संपूर्ण प्रकार घडला.

नेमके अजित पवार का भडकले?

बारामती तालुका संघाच्या (Baramati Taluka sangh) परिसरातील एका पेट्रोल पंपाचे अजित पवार उद्धाटन करून तिथल्या नागरिकांच्या कामाच्या संदर्भातील निवेदनानुसार अधिकाऱ्यांना सूचना देत होते. त्यावेळी एका कार्यकर्त्याने अनेक विकासकामे झाले नसल्याचे सांगितले. आणि इतर कार्यकर्त्यांनीही त्या कार्यकर्त्याची रि ओढत अजित पवारांना सवाल केला. त्यावेळी अजित पवार भडकत म्हणाले की, अरे तुम्ही मला मते दिली म्हणजे माझे मालक नाही झालात. मला सालगडी केलंय का? असा सवाल करत अजित पवार कार्यकर्त्यांवर चांगलेच संतापले. (Ajit Pawar)

दरम्यान लोकप्रतिनिधी काम करतात, मात्र काही मतदार तारतम्य न ठेवता काम झालेच पाहिजे अशी आरेरावी करतात. म्हणून अजित पवार भडकले असतील, अशा शब्दात मंत्री संजय शिरसाठ (Sanjay Shirsat) यांनी अजित पवारांची पाठराखण केली आहे. (Ajit Pawar)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.