Ajit Pawar : जोपर्यंत चंद्र – सुर्य आहेत तोपर्यंत मुंबई वेगळी कोणीच करु शकणार नाही – अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे उध्दव ठाकरे यांना खडे बोल

103
Ajit Pawar : जोपर्यंत चंद्र - सुर्य आहेत तोपर्यंत मुंबई वेगळी कोणीच करु शकणार नाही - अजित पवार

नीती आयोगाच्या बैठकीवरुन काहीजण बोलत आहेत. त्यांना विकासाबद्दल बोलायचं नाही. नीती आयोगाने देशातील चार शहरे निवडली आहेत. त्यात मुंबई शहराचा समावेश आहे. मात्र मुंबई वेगळी करण्याच्या विषयावर काहीजण राजकारण करत आहेत. मी (Ajit Pawar) खोटं कधी बोलत नाही हे अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे. त्यामुळे जोपर्यंत चंद्र – सुर्य आहेत तोपर्यंत मुंबई वेगळी करण्याचे काम कुणाचा बापही आला तरी करु शकत नाही असा ठाम दावा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला आहे.

वरळी येथे महायुतीची सभा मोठ्या उत्साहात पार पडली. या सभेत पवार (Ajit Pawar) यांनी विरोधकांना जोरदार खडेबोलही सुनावले.

शाहू, फुले,आंबेडकर यांच्या विचारांना पुढे घेऊन आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात काम करत आहोत.त्यामुळे आता झालं गेलं विसरून नवीन पहाट बघून काम करायचे आहे असा विश्वासही पवार (Ajit Pawar) यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला.

(हेही वाचा –  Jalna Maratha Andolan : जालन्यातील परिस्थितीला प्रशासनच जबाबदार – राज ठाकरे)

आपल्या राज्याचा विकास झाला पाहिजे. योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचल्या पाहिजेत. थांबलेली कामे वेगवान पध्दतीने व्हावी यादृष्टीने सरकारने पाऊले टाकण्यास सुरुवात केली आहे. नैसर्गिक संकटांचा सामना महाराष्ट्राने पाहिला आहे. संकट आल्यावर न डगमगता छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने पुढे जायचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करायचे आहेत. मागे काय झालं हे उकरत न बसता चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या जागा निवडून आणावयाच्या आहेत असे आवाहनही उपमुख्यमंत्री पवार (Ajit Pawar) यांनी केले.

जाणीवपूर्वक आमच्याबद्दल काही बातम्या पसरवल्या जात आहेत.मी, मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस जनतेचे हित लक्षात घेऊन सरकारमध्ये काम करत आहोत असेही पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले.

येत्या वर्षभरात पूर्ण होणाऱ्या प्रकल्पावर सरकार अधिक लक्ष देणार आहे. सर्वसामान्य लोकांचे कल्याण हेच आमचे ध्येय आहे. सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करतानाच त्यांची काळजी घेत आहोत.महामानवांच्या विचारावर आमची वाटचाल सुरू आहे. सर्वांच्या विचाराने महायुतीत आम्ही सहभागी झालो आहोत असेही पवार (Ajit Pawar) यांनी यावेळी नमूद केले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.