Ajit Pawar : बारामतीतील मतदानानंतर अजित पवार ‘नॉट रिचेबल’ ?; राष्ट्रवादी काँग्रेस काय म्हणते ?

307
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणा; DCM Ajit Pawar यांच्या कार्यकर्त्यांना सूचना

बारामती मतदारसंघाची निवडणूक (Baramati Constituency Election) झाल्यानंतर अजित पवार राज्याच्या प्रचारात फारसे दिसून आले नाहीत. त्याची चर्चाही फारशी दिसून आली नाही. नाशिक किंवा कल्याणची सभा असो किंवा मुंबईतील रोडशो असो, राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार हे कुठेही दिसून आले नाही. त्यामुळे अजित पवार (Ajit Pawar) नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

(हेही वाचा – Arvind Kejriwal कारागृहाबाहेर आल्याने काँग्रेसचे नुकसान होणार की भाजपाचे; काय म्हणाले प्रशांत किशोर?)

अजित पवार नाराज असल्याची चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या कल्याण आणि नाशिकमध्ये झालेल्या जाहीर सभांमध्येही ते दिसले नाहीत. तसेच मुंबईत त्यांचा रोडशोदेखील आयोजित करण्यात आला. मात्र नाशिक किंवा कल्याणची सभा असो किंवा मुंबईतील रोडशो असो, राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार हे कुठेही दिसून आले नाही. त्यामुळे अजित पवार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

उद्यापासून पुन्हा प्रचारात सहभागी होणार

अजित पवार यांच्या अनुपस्थितबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress Party) मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन याविषयी माहिती दिली आहे. “अजित पवार नॉटरिचेबल असले की ते नाराज आहेत, अशा बातम्या माध्यमांमध्ये दाखवल्या जातात. ते नॉटरिचेबलही नाही आणि नाराजही नाहीत. अजित पवार यांना निवडणुकीच्या कार्यकाळात घशाचे इन्फेक्शन झाले होते, त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना काळजी घ्यायला सांगितली आहे. मात्र ते उद्यापासून पुन्हा प्रचारात सहभागी होतील”, अशी भूमिका उमेश पाटील यांनी मांडली आहे.

काँग्रेसने केलेले आरोप पूर्णपणे खोटे

अजित पवार (Ajit Pawar) यांना जाणीवपूर्वक प्रचारापासून दूर ठेवले जात असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला होता. या आरोपालाही उमेश पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. उमेश पाटील म्हणाले की, “काँग्रेसने केलेले आरोप पूर्णपणे खोटे आहेत. यात काहीही तथ्य नाही. अजित पवार यांचे कार्यकर्ते महाराष्ट्रातील प्रत्येक गावामध्ये, वॉर्डात, तालुका, जिल्ह्यात आहेत. पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या नेत्याला प्रचारापासून बाजुला ठेवून कोण स्वतः चे नुकसान करून घेईल का ?”

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.