Ajit Pawar : देशात मोदींशिवाय पर्याय नाही- अजित पवार

ईव्हीएम घोटाळा हा रडीचा डाव आहे. जनतेने जो कौल दिला आहे तो मान्य केला पाहिजे. ईव्हीएम घोटाळा एकाला शक्य नाही, असे अजित पवार म्हणाले.

211
Ajit Pawar : देशात मोदींशिवाय पर्याय नाही- अजित पवार
Ajit Pawar : देशात मोदींशिवाय पर्याय नाही- अजित पवार

चार राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल रविवारी जाहीर होत आहेत. त्यात तेलंगणा वगळता राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये भाजप आघाडीवर असून काँग्रेस पिछाडीवर आहे.तेलंगणा एबीव्हीपीचा कार्यकर्ता काँग्रेसने खेचला अन्यथा तेलंगणाचं चित्रही वेगळं दिसलं असते. आमचा निर्णय काहींना आवडला नव्हता पण देशात मोदींशिवाय पर्याय नाही हे आता स्पष्ट झालं, भाजपच्या विजयानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार म्हणाले, मोदींमुळे देशाची प्रतिमा उंचावली आहे. निकाल चांगला येणार हे मी आधीच बोललो होतो. मोदींच्या नेतृत्वाखाली देशाची प्रगती होत आहे. इंडिया, इंडियावाले आता ईव्हीएमबाबत बोलतील. ईव्हीएम घोटाळा हा रडीचा डाव आहे. मोंदींसमोर कोण उमेदवार असणार आहे हे सुद्धा विरोधकांचं ठरलं नाही. जनतेने जो कौल दिला आहे तो मान्य केला पाहिजे. ईव्हीएम घोटाळा एकाला शक्य नाही. c

काहीजण दिशाभूल करण्याचे काम करत आहेत :अजित पवार
कर्जतमध्ये दोन दिवसाचं शिबिर घेतलं. त्यावर वरिष्ठांनी काही प्रतिक्रिया दिली. मी अनेक वर्ष सत्तेत आहे. मला खोट बोलत येतं नाही. काहीजण दिशाभूल करण्याचे काम करत आहेत. आम्ही सर्व जाती धर्माच्या लोकांनां प्रतिनिधी केलं आहे. आम्ही काही चांगलं करत आहोत. यासाठी नरेंद्र मोदी अमित शाह यांची मदत घेऊन महाराष्ट्राला एक नंबर करण्याच काम करत आहोत, असे अजतअजित पवार म्हणाले. (Ajit Pawar )

(हेही वाचा : Assembly Election 2023 Result : भाजपची 3 राज्यांत आगेकूच; काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?)

अजित पवारांचा शरद पवारांवर निशाणा
अजित पवरांनी यावेळी शरद पवारांवर देखील निशाणा साधला आहे. अजित पवार म्हणाले, काहींनी आशीर्वाद द्यायला पाहिजेत परंतु ते थांबायला तयार नाहीत त्यामुळे आम्ही बहुमताने निर्णय घेतला आहे. तीन राज्यांनी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्रात देखील लोकसभा जागा निवडून येण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. 48 पैकी 45 जागा आम्ही निवडून आणणार आहोत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.