Dhananjay Munde यांच्या राजीनाम्याबद्दल अजित पवार काय म्हणाले ?

72
Dhananjay Munde यांच्या राजीनाम्याबद्दल अजित पवार काय म्हणाले ?
Dhananjay Munde यांच्या राजीनाम्याबद्दल अजित पवार काय म्हणाले ?

बीडच्या (Beed) केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच दिवंगत संतोष देशमुख (Santosh Deshmukh)यांच्या हत्या प्रकरणाला ८० दिवस उलटले आहेत. अद्याप या प्रकरणातील कोणत्याही आरोपीला शिक्षा झालेली नाही. दरम्यान, याप्रकरणी सीआयडीने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं. या दोषारोप पत्रातून वाल्मिक कराड मुख्य सूत्रधार असल्याचे सीआयडीने सांगितले. त्यातच धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी त्यांच्या स्वीय सहाय्यकामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे.

( हेही वाचा : Uddhav Thackeray अडचणीत?

त्यातच धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्यावर राजकीय नेत्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दोन वाक्यात यावर प्रतिक्रिया दिली. पवार म्हणाले की, “धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी नुकताच त्यांचा राजीनामा दिला आहे. त्यांनी नैतिकतेवर राजीनामा दिला आहे.”

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) नुकतेच विधीमंडळाबाहेर प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले की, “आज राज्याचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा मी स्वीकारला आहे. पुढील कार्यवाहीसाठी मी तो राजीनामा राज्यपालांकडे पाठवला आहे. धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा राजीनामा स्वीकारून आम्ही त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्यांमधून मुक्त केलं आहे.”

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.