वाड्:मय, शास्त्र, कला, सहकारी चळवळ आणि समाजसेवा या क्षेत्रांमध्ये विशेष ज्ञान किंवा व्यावहारिक अनुभव असणाऱ्या व्यक्तींची विधानपरिषदेवर राज्यपालांकडून नियुक्ती केली जाते. राज्यपाल नियुक्त आमदारांच्या जागा चार वर्षांपासून रिकाम्या होत्या. अखेर महायुती सरकारने सादर केलेल्या नावांच्या यादीतून राज्यपाल रमेश बैस यांनी 7 जणांच्या नावांना मंजुरी देत असल्याचं राजपत्र प्रसिद्ध केलं आहे. त्यानुसार विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये 7 सदस्यांचा शपथविधी पार पडला आहे. (AJit Pawar)
राज्यपालांना भेटल्यावर विनंती करु…
पण, उरलेल्या ५ जागांवर काय होणार? यासंदर्भात अनेकांनी प्रश्न उपस्थित केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर भाष्य केलं आहे. अजित पवार म्हणाले, “राज्यपालांनी विधानपरिषदेवर 7 जणांची नियुक्ती केली आहे. हा विषय अनेक दिवस प्रलंबित होता. या राज्यपालांनी ते मनावर घेतलं, तो त्यांचा अधिकार असतो. परंतु 12 न घेता 7 का घेतले हे कळायला मार्ग नाही. राहिलेले 5 घ्या याबाबत राज्यपालांना भेटल्यावर विनंती करु.” असं अजित पवार (AJit Pawar) म्हणाले.
भाजपच्या चित्रा वाघ, विक्रांत पाटील आणि धर्मगुरु बाबुसिंग महाराज राठोड यांना संधी देण्यात आली आहे. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी खासदार हेमंत पाटील आणि माजी आमदार मनीषा कायंदे यांना संधी दिली आहे. अजित पवारांच्या कोट्यातून पंकज भुजबळ आणि इद्रिस नायकवडी यांना संधी देण्यात आली आहे. (AJit Pawar)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community