OBC Reservation: निवडणूक फाॅर्म भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ओबीसी आरक्षणासाठी प्रयत्न करु- अजित पवार

92

राज्यात ओबीसी आरक्षणावरुन राजकीय वातारवण तापले आहे. त्यात आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणुकीचा फार्म भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ओबीसी आरक्षणासाठी आमचा प्रयत्न राहील,असे सांगितले आहे. ते मुंबईत बोलत होते. शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे कारागृहातील कैद्यांसाठी स्पर्धा भजन आयोजित करण्यात आली होती. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार यांनी ओबीसी आरक्षणासंदर्भात माहिती दिली.

न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करावा

ओबीसी आरक्षण मिळावे यासाठी राजकारण न करता प्रयत्न करु असे, अजित पवार यावेळी म्हणाले. भाटिया कमिटी नियुक्त करण्यात आली आहे. इम्पिरिकल डेटा मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करु, अशी ग्वाहीदेखील अजित पवार यांनी यावेळी दिली. मध्य प्रदेश सर्वोच्च न्यायालयात गेले आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. त्यामुळे मध्य प्रदेशच्या धर्तीवर जागा पन्नास टक्क्यांच्या वर न जाऊ देता ओबीसींना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न राहील. तसेच, न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा सर्वांनीच आदर करायला हवा, असेही ते म्हणाले.

(हेही वाचा: नवलानी प्रकरणाचं काय झालं? सरकारचा तपास कुठंवर आलाय? सोमय्यांचा सरकारला सवाल)

आमचे मनापासून प्रयत्न सुरु

ज्या अधिका-यांशी बोलणे व्हायला हवे, त्या अधिका-यांशी आमचे बोलणे झाले आहे. त्यांनीही सकारात्मकता दाखवली आहे. शेवटी प्रयत्न करणे आपल्या हातामध्ये आहे. इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठीच भाटिया समिती नियुक्त केली आहे. भाटिया समितीदेखील यावर काम करत आहे, असे ते म्हणाले. तर विरोधक काय म्हणत आहेत, काय टीका करत आहेत. याकडे लक्ष न देता आम्ही मनापासून प्रयत्न करत असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.