Ajit Pawar: यशवंतराव चव्हाण यांच्या विचारधारेला सोडून शरद पवार गेलेच ना? अजितदादांचा सवाल

196
NCP : अजितदादांची राष्ट्रवादी परफॉर्मन्समध्ये झिरो; तरीही राष्ट्रवादीच्या नेत्यांचा भाजपालाच इशारा!

यशवंतराव चव्हाण यांनी शरद पवारांना वाढवलं, नंतर यशवंतराव चव्हाण यांच्या विचारधारेला सोडून शरद पवार (Sharad Pawar) गेलेच ना? असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) शरद पवारांना टोला लगावला आहे. अजित पवार म्हणाले, “यशवंतराव चव्हण साहेबांच्या विचारधारेला सोडून ते गेलेच ना? पवार साहेबांनी त्यांच्या पुस्तकात स्वतः लिहिलं आहे. मी 35 वर्षे साथ दिली. पण आता मी 60 च्या वर गेलो, कधीपर्यंत थांबायचं मी आता.. मी अनेक वेळा साहेबांना सांगितले होते.” असे म्हणत अजितदादांनी शरद पवारांवर टीका केली आहे.

(हेही वाचा –Virat Kohli Net Worth : विराट कोहलीकडे एकूण किती पैसा आहे माहीत आहे? लाईफ स्टाईल आणि कमाईचा आकडा बघून व्हाल थक्क )

शिरुरमध्ये महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळरावांच्या (Shivajirao Adhalrao Patil) प्रचारासाठी अजित पवारांची (Ajit Pawar) आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथे जाहीर सभा झाली. त्यावेळी अजित पवार (Ajit Pawar) बोलत होते. अजित पवार म्हणाले, “शिरुरमध्ये धरण आहे. पाणी आपल्या उशाशी आहे, मात्र काही जण पाणी पळवून नेत आहेत.जुन्नर आणि आंबेगावला जेवढी पाण्याची गरज आहे, तेवढच ठेवा. वर बोगदा काढा आणि ओव्हर फ्लोचे पाणी घेऊन जा. परंतु आता खालून बोगदा काढला तर उन्हाळ्यात आम्ही आम्ही काय चुना लावत बोंबलत बसू का?” असे म्हणत उपुमख्यमंत्री अजित पवारांनी आमदार रोहित पवारांवर (Rohit Pawar) निशाणा साधला आहे. (Ajit Pawar)

(हेही वाचा –Solapur: बागलवाडी येथे तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न, तरुणावर गुन्हा दाखल)

शिवरायांची भूमिका ते अगदी महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या गोडसेंची भूमिका, समाज व्यसनाधीन होईल अशा जाहिराती करून आपलं पोट भरू नये, असे म्हणत शिरुरचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हेंच्या अभिनयावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) खोचक टोला लगावला आहे. बारामतीत मी आई सोबत मतदानाला गेलो. आता मी ज्या आईच्या पोटी जन्माला आलो, तिला सोबत घेऊनच मतदानाला जाणार ना? बरं पहिल्यांदाच गेलो असं आहे का? प्रत्येक मतदानाला माझी आई माझ्यासोबत मतदानाला येते. यांच्या पोटात आत्ताच का दुखलं? म्हणाले दादा राजकारण करत आहेत. आता यात कसलं राजकारण आलं. आईने मला सांगितलं, आपण दोघांनी सोबतच जायचं, म्हणून प्रत्येकवेळी प्रमाणे आम्ही मतदान केलं. असं महणत विरोधकांच्या टीकेला अजितदादांनी प्रत्त्युत्तर दिले. (Ajit Pawar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.