Ajit Pawar: सुनेत्रा पवारांचा फॉर्म भरताना महायुतीचे नेते का नव्हते? अजितदादा म्हणाले…

246
Ajit Pawar : अल्पवयीन आरोपींचं वय १४ वर्षे करण्याचा विचार
Ajit Pawar : अल्पवयीन आरोपींचं वय १४ वर्षे करण्याचा विचार

सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी राज्यसभेचा फॉर्म भरताना महायुतीचे नेते उपस्थित नव्हते. यावरुन अनेक चर्चांना उधाण आले होते. महायुतीत नाराजी असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी माध्यमांशी संवाद साधताना याचे कारण स्पष्ट केले.

… तरीही बातम्या चालवल्या

“काल आम्ही फॉर्म भरला, पण त्याआधी एक दु:खद घटना घडलेली. देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय अमोल काळे यांचं निधन झालं. अस्थी विसर्जनासाठी त्यांना नाशिकला जायच होतं. ते दोन दिवस दु:खात आहेत. एकनाथ शिंदे यांना रात्री वर्षावर जाऊन भेटलो. उमेदवाराच नाव आज किंवा उद्या ठरेल असं सांगितलं. सगळ्यांनी फॉर्म भरायला याव असं मला वाटलं नाही. एकनाथ शिंदे म्हणाले फॉर्म भरुन या. महायुती सोबत आहे. मीच त्यांना बोलावल नव्हतं. तरीही बातम्या चालवल्या महायुतीचे नेते दिसत नाहीयत म्हणून. व्यक्ती दु:खात असताना फॉर्म भरायला चला असं म्हणण योग्य वाटत नाही.” असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. (Ajit Pawar)

‘पराभवावर मला चिंतनाची गरज नाही’

पुढे बोलताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, “मला तुम्ही विकासाबद्दल विचारा. मी विकासामध्ये लक्ष घातलय. आपलं राज्य, जिल्ह्यातील महत्त्वाची काम कशी मार्गी लागतील हा प्रयत्न आहे. नव्या उमेदीने विधानसभेला महायुती पुन्हा सामोरी जाईल.” असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला. ‘पराभवावर मला चिंतनाची गरज नाही’ असही अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले. राज्यसभेची उमेदवारी सुनेत्रा पवार यांना जाहीर झाल्याने छगन भुजबळ नाराज आहेत का? या प्रश्नावर अजित पवार म्हणाले की, “तुम्हाला काही महित नसतं. बातम्या पेरण्याचा काम तुम्ही करता. तो तुमचा अधिकार आहे. स्वत: छगन भुजबळ म्हणाले मी नाराज नाही. तरीही काही विरोधक, जवळचे मित्र अशा बातम्या पिकवत आहेत, त्यात तूसभरही तथ्य नाही. पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय झाला.” असं अजित पवार म्हणाले. (Ajit Pawar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.