लोकसभेच्या उमेदवारीसाठी आधी आक्रमक झालेले विजय शिवतारे (Vijay Shivatare) यांनी माघार घेऊन आपण महायुतीमध्येच असल्याचं जाहीर करत सर्वकाही शांत झाल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र, यासंदर्भात अजित पवार (Ajit Pawar) यांना माध्यम प्रतिनिधींनी विचारणा केली असता अजित पवार (Ajit Pawar) चांगलेच भडकले. महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त पुण्याच्या भिडे वाड्यात अजित पवारांनी (Ajit Pawar) स्मारक स्थळाचं दर्शन घेतलं. महात्मा फुलेंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर माध्यम प्रतिनिधींशी बोलताना अजित पवारांनी (Ajit Pawar) स्मारकाचं नुतनीकरण करण्याचा निर्णय सांगितला. (Ajit Pawar)
(हेही वाचा – ISRO : मानवाला चंद्रावर पाठवण्यासाठी भारताची तयारी – एस. सोमनाथ)
अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, “एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, छगन भुजबळ असे आम्ही सगळ्यांनी मिळून महात्मा फुले आणि सावित्री फुले यांचं स्मारक करायचं ठरवलं आहे. आधीच स्मारक आहे, पण जागा कमी पडतेय. त्यामुळे आसपासची जागा घेऊन तिथे काम केलं जाईल. भिडे वाड्यात जिथे पहिली मुलींची शाळा सावित्रीबाई फुलेंनी सुरू केली होती, तीही जागा आता पालिकेच्या ताब्यात आली आहे. त्याचे पाच ते सहा आराखडेही तयार झाले आहेत. या दोन्ही कामांना निधीची अडचण भासणार नाही, ही ग्वाही सरकारकडून मी देतो.” असं पवार म्हणाले.(Ajit Pawar)
विजय शिवतारेंना कुणाकुणाचे फोन आले होते?
विजय शिवतारे यांच्याप्रश्नावर बोलताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, “विजय शिवतारेंनी (Vijay Shivatare) एकनाथ शिंदेंच्या वर्षा बंगल्यावर मी, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांसह बसलो होतो तेव्हा त्यांच्या भागातले महत्त्वाचे विषय मांडले. ते म्हणाले की मी महायुतीबरोबर आहे, पण ते विषय सरकारनं मार्गी लावायला हवेत असं ते म्हणाले. त्याचवेळी त्यांनी सांगितलं होतं की मी एक दिवस सभा आयोजित करतो. त्या सभेला मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी यावं. तेव्हा आम्ही तसा शब्द दिला होता. त्यानुसार त्यांनी ११ तारखेला तिथल्या मैदानात सभा आयोजित केली आहे. त्या सभेला मुख्यमंत्री व मीही जाणार आहे.” असं अजित पवार म्हणाले. (Ajit Pawar)
(हेही वाचा – Indian Coast Guard : भारतीय तटरक्षक दलाच्या ‘समुद्र पहरेदार’ जहाजाचा ब्रुनेईमध्ये थांबा)
पत्रकारांनी विजय शिवतारेंना (Vijay Shivatare) यादरम्यान कुणाकुणाचे फोन आले होते? असा सूचक प्रश्न केला असता अजित पवार त्यावर संतापले. “तुम्ही मला मूर्ख समजू नका. मी सांगायचं तेवढं सांगितलं आहे. मला संविधानाप्रमाणे मला जेवढं बोलायचं आहे तेवढं मी बोललो आहे.” असं ते म्हणाले. (Ajit Pawar)
हे पहा-
Join Our WhatsApp Community