ST Strike! आधी जल्लोष नंतर आक्रोश …कशासाठी?

117

ज्यांनी सिल्व्हर ओकवर हल्ला केला ते आपल्याच राज्यातील आहेत. त्यांना कोणीतरी शिकवले होते. त्यांची माथी भडकवण्याचे काम कोणीतरी करत आहे. शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर प्रतिक्रिया देताना,  ‘हा हल्ला म्हणजे पोलीस यंत्रणेचे अपयश आहे’, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

मग पोलीस यंत्रणांना का समजले नाही

यावेळी अजित पवार म्हणाले की, ‘मला आश्चर्य वाटत की दोन दिवसांपूर्वी न्यायालयाच्या निकालानंतर आंदोलन यशस्वी झाले म्हणून गुलाल उधळण्यात आला. मग सिल्व्हर ओकवर जाण्याचा काय उद्देश होता. हे पोलीस यंत्रणेचे अपयश आहे. पोलिसांना हे आधी कसे कळले नाही. तिथे जाणारे आंदोलक मीडियाला घेऊन पोहचले. अर्थात मीडियाचे हे कामच आहे की जे आहे ते दाखवणे. मग मीडियाला जे कळले ते पोलीस यंत्रणेला का कळले नाही.’

मग सिल्वर ओकवर हल्ला का?

या सगळ्या घटनेत पोलीस यंत्रणा आणि गृह खाते कसून तपास करत आहे. दरम्यान, मागच्या दोन दिवसांपूर्वी न्यायालयाने निकाल दिला होता. त्यावर एसटी कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त करत जल्लोष केला. मग शरद पवार यांच्या घरावर हल्ला करणे चुकीचे असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

( हेही वाचा :आता सर्वांनाच 10 एप्रिलपासून बूस्टर डोस! )

मास्टरमाईंड लवकरच समोर येणार

दरम्यान, मीडियाला या हल्ल्याबाबत समजते पण पोलीस यंत्रणेला कसे समजत नाही  हा आश्चर्याचा भाग आहे. सुप्रिया सुळे घटनास्थळी होत्या. चर्चेसाठी मी तयार असल्याचे त्या सांगत होत्या. तरीही एसटी कर्मचारी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. या पाठीमागे त्यांची माथी भडकवण्याचे काम कोण करत आहे ते लवकर समोर येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.