Ajit Pawar : अमित शाह महाराष्ट्राचे जावई; राज्यावर विशेष प्रेम – अजित पवार

186

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं कौतूक केलं. अजित पवार Ajit Pawar यांनी अमित शाह हे महाराष्ट्राचे जावई आहे, त्यामुळे त्यांचे महाराष्ट्रावर अधिक प्रेम आहे, असे म्हटले.

केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहात केंद्रीय सहकार संस्था निबंधकांनी विकसित केलेल्या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. केंद्रीय सहकार संस्था निबंधक कार्यालयाने सहकारातून समृद्धी संकल्पनेअंतर्गत संकेतस्थळ विकसित केले आहे. शाह यांच्या हस्ते दुपारी या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांच्यासह राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह इतर मंत्री आणि नेते उपस्थित होते.

अजित पवार काय म्हणाले?

नरेंद्र मोदी यांचं सहकारातून समृद्धीचं लक्ष प्राप्त करण्यासाठी अमित शाह यांचा विभाग प्रयत्न करत आहे. अमित शाह गुजरातमधून येतात, पण अधिक प्रेम महाराष्ट्रावर करतात, असं अजित पवार म्हणाले. अजित पवार यांनी हे सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला. यावर अजित पवार यांनी कारण सांगितलं, ते म्हणाले अमित शाह महाराष्ट्राचे जावई आहेत. आपण मान्य केलं नाही तर जावयाला सासरच्या लोकांवर जास्त प्रेम असतंच. अमित शाह यांच्या नेतृत्त्वात वेब पोर्टलचं उद्घाटन हे महत्त्वाचं पाऊल आहे. महाराष्ट्र आणि देशातील सहकारी संस्थांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण होईल, असं अजित पवार म्हणाले.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

महाराष्ट्राची भूमी सहकाराची भूमी आहे. महाराष्ट्रात सहकाराची मुहूर्तमेढ रोवली गेली. देशात सर्वाधिक सहकार महाराष्ट्रात ग्रामपातळीपर्यंत पोहोचला. मोठं सहकार क्षेत्र महाराष्ट्रात निर्माण झालं. अमित शाह यांनी सहकार मंत्रालय स्वीकारल्यानंतर नवा कायदा केला. गावपातळीवर सहकाराचं जाळं नेलं पाहिजे यासाठी व्यवस्था निर्माण केली त्यासाठी पोर्टल निर्माण केलं. त्या पोर्टलचं उद्घाटन अमित शाह यांनी महाराष्ट्रात पुण्याची निवड केली, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. अजित पवार म्हणाले की अमित शाहांचं महाराष्ट्रावर प्रेम आहे, ते महाराष्ट्राचे जावई आहेत हे खरं आहे. पण, अमित शाह यांचा जन्म मुंबईत झाला आहे. अमित शाह राजकारणात नव्हते त्यावेळी उद्योग करत होते. त्यांचा उद्योग महाराष्ट्रात होता, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.