अजित पवारांनी भाजपा प्रवेशाच्या चर्चांना दिला पूर्णविराम!

139

“गेल्या दोन दिवसांपासून बघतोय, गुलाबराव पाटील बोलले, उदय सामंत बोलले, दादाजी भुसे बोलले. अनेकांची वक्तव्य मी ऐकली. या सगळ्यांचं एवढं प्रेम का उतू चाललंय ते कळायला मार्ग नाही. मी माझी भूमिका तुमच्यासमोर ठेवली आहे,” असे म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ते भाजपात जाणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला. महाविकास आघाडीच्या सभेकरीता नागपुरात आले असता ते बोलत होते.

(हेही वाचा –अमित शहांना भेटणाऱ्या नेत्यांच्या यादीतून पंकजा मुंडेंचे नाव वगळले?

यावेळी अजित पवार म्हणाले की, नागपुरातही माझ्याबाबत चर्चा सुरू होत्या. अजित पवार येणार की नाही? आले तर भाषण करणार की नाही करणार? बसणार तर कुठे बसणार? अशी चर्चा लोकांनी सुरू केली होती. पण, आमच्याकडून जयंत पाटील आणि अनिल देशमुख बोलणार आहे. जनतेला फार वेळ थांबावे लागू नये म्हणून प्रत्येक पक्षाकडून दोघेच बोलतील असा निर्णय घेण्यात आल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

गैरसमज पसरवणाऱ्या बातम्या देऊ नका

दरम्यान, अजित पवार आणि अमित शाह यांची गुप्त भेट झाल्याच्या चर्चेवरही अजित पवारांनी पडदा टाकला. “कुठं झाली? केव्हा झाली? मुंबईत अमित शाह उतरल्यापासून सगळे चॅनल त्यांच्या पाठिशी होते. तिथून ते विनोद तावडेंच्या घरी गेले. तिथून ते सह्याद्रीला गेले. मी कालच नागपुरात येणार होतो. पण सभा संध्याकाळी असल्यामुळे माझे अनिल देशमुखांशी बोलणे झाले. इथे एक कार्यक्रम आहे, तो करून दुपारी अनिल देशमुखांकडे जेवण आहे. त्यामुळे या सगळ्या बातम्या बिनबुडाच्या आहेत. अशा गोष्टी लपून राहात नसतात. त्यामुळे कारण नसताना गैरसमज निर्माण करण्याचं काम कुणीही करू नये.

आता अपक्ष पक्षाकडून भाजपाकडे ११५ आमदार आहे. ४० आणि ११५ मिळून १५५ होतात. आणि इतर १० आमदार आहेत. म्हणजे १६५ होतात. बहुमताचा आकडा १४५ आहे. उद्या १६ आमदार अपात्र झाले तरी त्यांच्याकडे १४५ आमदार राहिल ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे कारण नसताना संभ्रम निर्माण करू नका असे पवार यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.