महाराष्ट्राच्या राजकारणात रविवार हा वेगवान घडामोडीचा ठरत आहे. कारण रविवार, २ जुलै रोजी सकाळपासून अजित पवार यांनी विधिमंडळाच्या आमदारांची बैठक त्यांच्या देवगिरी बंगल्यावर घेतली, ही बैठक आटोपून अजित पवार तडक राजभवनाकडे रवाना झाले. त्यावेळी त्यांच्या जवळ २५ आमदारांच्या स्वाक्षरीचे पत्र असल्याचा दावा केला आहे.
विशेष म्हणजे त्याच वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही राजभवनात जात असल्याचे समजते. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राष्ट्रवादीकडून मात्र याबाबत खासगीत प्रतिक्रिया देताना अजित पवार हे विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देण्यासाठी राजभवनावर जाऊ शकतात असे सांगितले जात आहे, मात्र दुसरीकडे अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी राजभवनात जात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
(हेही वाचा Ajit Pawar : अजित पवारांचा हट्ट होणार पूर्ण? राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचाली)
Join Our WhatsApp Community