Ajit Pawar : अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा

147

शिंदे फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर, अजित पवार यांनी रविवारी दुपारी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत अजित पवारांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी सरकारबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्याचे अजित पवार म्हणाले. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हासह आम्ही सरकारला पाठिंबा दिला असून पक्षाच्या चिन्हावरच पुढील निवडणुका लढवू असे अजित पवार यावेळी म्हणाले.

आम्हाला सर्वच नेत्यांचा आशीर्वाद

शरद पवारांना याची कल्पना आहे का असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर आम्हाला पक्षाच्या सर्वच नेत्यांचा आशीर्वाद आहे असे अजित पवार म्हणाले. तसेच जर आम्ही शिवसेनेसोबत जर जाऊ शकतो, तर भाजपसोबतही जाऊ शकतो असेही ते यावेळी म्हणाले.

(हेही वाचा Sharad Pawar : शरद पवारांनी सांगितले अजित पवारांच्या बंडामागील कारण; म्हणाले…)

काय म्हणाले अजित पवार?

हे सरकार आहे, त्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बहुसंख्य आमदारांनी जाण्याचा निर्णय घेतला. राज्यपाल महोदयांनी आम्हाला शपथ दिली. अजूनही मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार आहे. त्यातही इतरांना मंत्रिपदे मिळणार. अनेक दिवस चर्चा सुरू होती. देशपातळीवरील राजकीय परिस्थिती, राज्याची परिस्थिती बघता विकासाला महत्व दिलं पाहिजे असे माझे आणि सहकाऱ्यांचे स्पष्ट मत आले. अतिशय मजबुतीने देशाला पुढे नेण्याचा प्रयत्न मोदीसाहेब करत आहे. त्यामुळे आपणही त्यांना पाठिंबा दिला पाहिजे असे आम्हाला वाटले. शुक्रवारी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला. पक्षाच्या वर्धापन दिनाला भूमिका मांडली होती. इथून पुढे तरुणांना संधी देणे गरजेचे आहे. वेगवेगळ्या प्रांतात नवे कार्यकर्ते पुढे आणले पाहिजे तसा आमचा प्रयत्न आहे. जर आम्ही शिवसेनेसोबत जाऊ शकतो, तर भाजपसोबतही जाऊ शकतो. बहुतांश नेत्यांना माझा निर्णय मान्य. पक्षाचे चिन्ह व नाव आमच्याकडेच, आम्ही पक्षाच्या चिन्हावरच निवडणूक लढवू. पक्ष अधिक मजबूतीने पुढे नेण्याचा प्रयत्न करणार. सर्वांनी मिळून हा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळात आदिवासी, अनुसूचित जाती, महिला, ओबीसी, अल्पसंख्याक अशा सर्वांना प्रतिनिधित्व मिळेल याकडे आम्ही लक्ष दिले आहे. सर्व जण आमच्यासोबत, पक्ष आमच्यासोबत. नेतृत्वालाही आम्ही सांगितले. लोकशाहीत बहुमताला महत्व आहे. पक्षाने अनेकवेळा वेगवेगळे निर्णय घेतले आहेत. हे आपण पाहिले आहे. नवीन नेतृत्वाला आता संधी मिळाली पाहिजे. शेतकऱ्यांचे राज्याचे प्रश्न सुटले पाहिजे. त्या दृष्टीने आम्ही काम करू. वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळे निर्णय राजकीय पक्षांना घ्यावे लागतात. मात्र हे करत असताना राज्याचं हित बघावे लागते. ते बघूनच आम्ही निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ हे चिन्ह आणि नावावरच आम्ही लोकसभा, विधानसभा निवडणुका लढवणार. आम्हाला पाठिंबा आहे. पक्षाच्या सर्व नेत्यांचा आम्हाला आशीर्वाद आहे. महाविकास आघाडीचं काय होणार या प्रश्नावर अजित पवार म्हणाले ते तुम्हाला सर्वांना भविष्यात बघायला मिळेलच. आम्ही खूप चांगल्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढे नेऊ. मी जे सांगितले ते अधिकृत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.