त्यात वावगं काहीही नाही; शर्मिला पवारांचे आरोप Ajit Pawar यांनी फेटाळले

49
त्यात वावगं काहीही नाही; शर्मिला पवारांचे आरोप Ajit Pawar यांनी फेटाळले
त्यात वावगं काहीही नाही; शर्मिला पवारांचे आरोप Ajit Pawar यांनी फेटाळले

शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटल्यानंतर प्रथमच विधानसभा निवडणूक होत आहे. बारामती मतदान केंद्रावर ‘साहेब’ अन् ‘दादा’ यांच्या समर्थकांमध्ये जोरदार बाचाबाची झाल्याने राडा झाला. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी एकमेंकांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत. महात्मा गांधी बालक मंदीर या मतदान केंद्रावर दुपारी एकच्या सुमारास जोरदार बाचाबाची झाली. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

(हेही वाचा – Border-Gavaskar Trophy 2024 : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका कुठे प्रसारित होणार?)

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) विरुद्ध युगेंद्र पवार (Yugendra Pawar) असा सामना रंगत आहे. प्रचाराच्या सुरुवातीपासूनच दोन्ही गटांकडून मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोपांची राळ उठल्याचे पाहायला मिळाले. आता मतदान सुरू असताना अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांकडून आमच्या कार्यकर्त्यांना धमकावले जात असल्याचं सांगत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात आला आहे. याला अजित पवार यांनी देखील उत्तर दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाते उमदेवार युगेंद्र पवार यांच्या आई शर्मिला पवार (Sharmila Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर (अजित पवार गट) गंभीप आरोप केला आहे. अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांकडून दमदाटी आणि ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप शर्मिला पवार यांनी केला आहे.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून हा आरोप फेटाळून लावण्यात आला आहे. मतदान करण्यासाठी शर्मिला पवार आल्या होत्या, त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हा मोठा आरोप केला आहे. शर्मिला पवार त्या ठिकाणी पोहोचल्या, त्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित पवार हेही तेथे पोहोचले. शर्मिला पवार यांनी अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांवर केलेले आरोप अजित पवारांनी खोडून काढले आहे.

त्यात वावगं काहीही नाही – अजित पवार

शर्मिला पवार यांचा आरोप धादांत खोटे आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. आम्ही एवढ्या निवडणुका पार पडल्या पण आमच्या कार्यकर्त्यांनी कधीही अशी काही वक्तव्य केली नाही. आमची विचारधारा शाहू, फुले, आंबेडकरांची आहे. आम्ही कधीही असं करणार नाही. उमेदवार, कार्यकर्ते स्लीप देतात. घरुन येताना चिन्ह फाडायचं असतं. हा संकेत सुरुवातीपासूनच आहे. त्यात वावगं काहीही नाही. दुपारी १ वाजून गेला पण मतांची टक्केवारी कमी आहे. जास्तीत जास्त मतदारांनी मतदान केलं पाहिजे असं आवाहन मी करतो आहे असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. तक्रार केली आहे तर निवडणूक आयोग आणि पोलीस तपास करतील. कुठेही बोगस मतदान झालेलं नाही रे बाबा.. असंही अजित पवार म्हणाले. (baramati vidhan sabha 2024)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.