बारामतीतील पराभवानंतर Ajit Pawar यांचा मोठा निर्णय! कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदावरुन केली उचलबांगडी!

396
Cabinet Expansion वर अजित पवार गटाचा लवकरच प्रस्ताव

बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार यांचा पराभव झाल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या सांगण्यावरुन बारामती तालुका कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदावरुन युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांची उचलबांगडी करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बारामती तालुका कुस्तीगीर परिषदेच्या सदस्यांची नुकतीच बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीमध्ये युगेंद्र पवार यांना बारामती तालुका कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदावरुन दूर करण्याचा निर्णय घेण्यात आला. (Ajit Pawar)

(हेही वाचा –T20 WC, Ind vs Ire : जसप्रीत बुमराने मोडला भुवनेश्वर कुमारचा ‘हा’ विक्रम )

बैठकीला उपस्थित न राहिल्याचे कारण कुस्तीगीर परिषदेकडून पुढे करण्यात आले आहे. यावर आता युगेंद्र पवार आणि शरद पवार गट (Sharad Pawar) काय भूमिका घेणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. दरम्यान, युगेंद्र पवार यांनी आपल्याला या निर्णयाबाबत कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले. अध्यक्षपदावरून हटवण्याच्या बाबतीत मला अधिकृत अद्याप काही कळवण्यात आलेले नाही किंवा मला तसे काही पत्र प्राप्त झालेले नाही. मात्र, कुस्तीगीर परिषदेच्या सदस्यांची बैठक बोलावण्यात आली होती. त्यामध्ये काहीतरी निर्णय झाल्याची माहिती आहे. असं ते म्हणाले होते. (Ajit Pawar)

(हेही वाचा –Weather Update: महाराष्ट्रात ‘या’ जिल्ह्यांना बसणार पावसाचा तडाखा; यलोअलर्ट जारी)

बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्यात लढत झाली होती. सुप्रिया सुळे यांनी तब्बल 47 हजारांच्या मताधिक्याने सुनेत्रा पवार यांना हरवले होते. बारामती लोकसभा मतदारसंघातील सहापैकी पाच मतदारसंघांमध्ये सुप्रिया सुळे यांनी आघाडी घेतली होती. यामध्ये बारामती, इंदापूर, खडकवासला आणि बारामती विधानसभाक्षेत्राचा समावेश होता. हा अजित पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. (Ajit Pawar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.