राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून भाजपकडून अनेकदा सरकार पडण्याची भविष्यवाणी करण्यात आली आहे. त्यात आता केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी मी ब्राह्मणाला या राज्याचा मुख्यमंत्री झाल्याचे पाहू इच्छितो, असे विधान केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. बहुमत असेल तर तृतीयपंथीसुद्धा मुख्यमंत्री होऊ इच्छितो, असे विधान अजित पवार यांनी केले आहे.
(हेही वाचाः महापालिका निवडणुका मविआ एकत्र लढवणार? पवार म्हणतात…)
काय म्हणाले अजित पवार?
मुख्यमंत्री कोणीही होऊ शकतो. कुठल्याही जाती धर्माची व्यक्ती अथवा महिला असो किंवा तृतीयपंथी असो, राज्याचा मुख्यमंत्री कोणालाही होता येते. 145चं बहुमत आणा आणि राज्याचे प्रमुख व्हा, असे विधान अजित पवार यांनी केले आहे. आमदारांचे पाठबळ असेल तर हे सहज शक्य आहे, असेही ते म्हणाले.
रावसाहेब दानवे यांचे वक्तव्य
मी केवळ ब्राह्मणाला नगरसेवक किंवा नगराध्यक्ष पाहू इच्छित नाही ब्राह्मणाला या राज्याचा मुख्यमंत्री पाहू इच्छितो, असे विधान केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जालना येथे केले. या देशाला दिशा देण्याचे काम आपण सर्व समाजाने केले असल्याचेही दानवे म्हणाले. बुधवारी जालन्यात परशुराम जयंतीच्या निमित्ताने झालेल्या एका कार्यक्रमात दानवे यांनी हे वक्तव्य केले आहे.
(हेही वाचाः नवनीत राणांची जेलमधून सुटका, उपचारांसाठी ‘लिलावती’त दाखल)
Join Our WhatsApp Community