अजित पवार यांनी राज्याच्या अर्थसंकल्पावरील विरोधकांच्या उपस्थित प्रश्नांना शुक्रवारी (०७ जुलै) रोजी उत्तर दिले. यावेळी अजित पवारांनी राज्यातील गुंतवणूक, महसूली खर्च आणि वित्तीय तूट यावर अजित पवारांनी भाष्य करत विरोधकांना उत्तर दिले आहे. (Ajit Pawar)
दरम्यान विधानसभेत सादर झालेल्या अर्थसंकल्पावर अजित पवारांनी (Ajit Pawar) विरोधकांच्या अर्थसंकल्पावरील टीकेला निवेदनाद्वारे उत्तर दिले. यावेळी अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत विरोधकांनी कविता आणि शेरोशायरीच्या माध्यमातून उत्तर दिले, तर राज्यावरील महसूली खर्चाची तूट आणि राज्यावर असणारे कर्ज यांची सविस्तर माहिती अजित पवारांनी सभागृहात मांडली इतकेच नव्हे तर अजित पवारांनी लोकसभेच्या निकाल आणि आगामी विधानसभेवर सुद्धा भाष्य केले. (Ajit Pawa)
(हेही वाचा – Champions Return Home : भारतीय खेळाडूंना बघायला जेव्हा एक चाहता झाडावर चढला….)
अजित पवार काय म्हणाले?
अजित पवारांनी विरोधकांच्या अर्थसंकल्पावरील टीकेला निवेदनाद्वारे उत्तर देत म्हणाले की, अर्थसंकल्पात महिला, कष्टकरी वर्ग, शेतकरी आणि सर्वसामान्यांना बळकटी देण्याचा हेतूने तयार केला आहे. सभागृहात दहाव्यांदा अर्थसंकल्प मांडतोय, मी कोणत्याही बाजूला असलो तरी मला अर्थसंकल्प मांडण्याची संधी दिली जाते ही गोष्ट कोणीही नाकारु शकत नाही. तसेच महायुतीकडून अर्थसंकल्प मांडला की महाविकास आघाडी विरोध करते आणि महाविकास आघाडीकडून मांडला तेव्हा महायुती विरोध करायची हरकत नाही. असे म्हणत अजित पवारांनी राज्यातील महसूली जमा आणि तूट याबद्दल लेखाजोखा विधानसभेच्या पटलावर मांडला. केंद्राकडून राज्याला मिळणाऱ्या महसूली करात वाढ होणार अशी माहिती अजित पवारांनी सभागृहात दिली. (Ajit Pawar)
(हेही वाचा –Budget 2024-25 : आगामी अर्थसंकल्पात प्रमाणित वजावट एक लाखांवर आणणार?)
दरवर्षी जीएसीटीमधून ३० ते ३५ हजार कोटींची वाढ दरवर्षी पाहायला मिळते. राज्यात महसूली जमा वाढलेली आहे, २० हजार कोटींची महसूली तूट दिसली तरी त्यावर नियंत्रण आणू. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलीयन डॉलरवर नेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. राज्याचे उत्पादन ४४ लाख कोटी आहे, देशात १४ टक्के जीडीपीचा (GDP) वाटा महाराष्ट्र देतोय. असे विधान अजित पवार यांनी विरोधकांच्या अर्थसंकल्पावरील टीकेला निवेदनाद्वारे उत्तर देत म्हंटले. (Ajit Pawar)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community