अजित पवार आयकर अधिका-यांना म्हणतात ‘पाहुणे’! कारवाईवर काय म्हणाले?

उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह त्यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कार्यालयांवर दुसऱ्या दिवशीही आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे.

79

सध्या आयकर विभागाचे अधिकारी अर्थात ‘पाहुणे’ वेगवेगळ्या घरी आहेत, ते गेल्यावर यावर आपण प्रतिक्रिया देणार आहोत, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयकर विभागाच्या कारवाईविषयी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.

‘पाहुणे’ सध्या वेगवेगळ्या घरी आहेत, तपासणी करत आहेत, ते गेल्यावर आपण यावर बोलणार आहोत, आता आपण यावर काहीही बोलणार नाही. जे काही दीड हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत आहे, त्यावरही आपण बोलणार आहे, आपण काहीच केले नाही, त्यामुळे आपण घाबरत नाही, असे पवार म्हणाले.

(हेही वाचा : क्रूझवरील ड्रग्ज पार्टीत भाजप नेत्याचा मेहुणा! नवाब मलिक करणार भांडाफोड)

30 तासांपेक्षा जास्त काळापासून धाडसत्र

उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह त्यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कार्यालयांवर दुसऱ्या दिवशीही आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे. जवळपास 30 तासांपेक्षा जास्त काळापासून हे धाडसत्र सुरु आहे. महत्त्वाचे म्हणजे आयकर विभागाचे कर्मचारी सर्व तयारीने आले. सात ते आठ अधिकाऱ्यांनी कालची रात्र पार्थ पवार यांच्या ऑफिसमध्येच घालवली. त्यानंतर शुक्रवारी सकाळी 7 वाजल्यापासून पुन्हा कारवाईला सुरुवात झाली. अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्या, तसेच नातेवाईकांच्या मुंबई, गोवा, सातारा, पुणे, बारामती इथल्या कंपन्यांवर आजही आयकर विभागाकडून छापेमारीची शक्यता आहे.

पवारांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीचे आंदोलन

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या कार्यालयात आणि घरी केंद्रीय आयकर विभाग सूडबुद्धीने कारवाई करत असल्याचा आरोप करत पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी कारवाईच्या निषेधार्थ आंदोलन केले. केंद्र सरकारने केलेली ही कारवाई हेतुपुरस्सर असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला. तसेच केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.