खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यानंतर अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या. परंतु यावर आता अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले. मी नाराज असल्याच्या वृत्तामध्ये तथ्य नाही. मला केंद्रातल्या राष्ट्रीय राजकारणात रस नाही. माझ्यावर राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी आहे, असे अजित पवार म्हणाले.
अजित पवार म्हणाले की, मी राष्ट्रीय पातळीवरचा पदाधिकारी नाही. मी राज्याचा विरोधी पक्षनेता आहे. मला केंद्रातल्या राष्ट्रीय राजकारणात रस नाही. माझी कामाची पद्धत आणि राष्ट्रीय पातळीवरच्या कामाची पद्धत वेगळी आहे. 30 ते 32 वर्षांपूर्वी ठरवले. आपण आपल्या महाराष्ट्रात काम करायचे. तेव्हापासून मी राज्यात काम करतो आहे. अजित पवारांवर मीडियावर कोणतीही जबाबदारी नाही, असे मीडियामध्ये जाणीवपूर्वक दाखवले जाते. माझ्यावर राज्याच्या विरोधी पक्षनेतापदाची जबाबदारी आहे. मी नाराज असल्याच्या बातम्यांमध्ये तथ्य नाही, असे अजित पवारांनी स्पष्ट केले.
(हेही वाचा America : अमेरिका भारताला देणार नाटो देशांचे तंत्रज्ञान; भारत-अमेरिका संबंधांचे नवे युग)
राज्यात माझे रिपोर्टिंग अजित पवारांकडे – सुप्रिया सुळे
दरम्यान सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडे कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवल्यानंतर अजित पवारांवर नेमकी कोणती जबाबदारी असणार?, याकडे सर्वाचं लक्ष लागले होते. यावर सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले आहे. अजित पवार हे राज्याचे विरोधी पक्षनेते आहेत, त्यांचे पद हे मुख्यमंत्री समान असते. मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेत्याची राज्यात मोठी भूमिका असते आणि कार्यध्यक्ष झाल्यावर राज्यात माझे रिपोर्टिंग अजित पवारांकडे असणार आहे, असे सुप्रिया सुळेंनी सांगितले. यावरुन राज्याची जबाबदारी अजित पवारांवर असल्याचा अंदाज आहे.
Join Our WhatsApp Community