- प्रतिनिधी
विधानसभेला पुन्हा पाच वर्षांसाठी विरोधात बसण्याची वेळ आल्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे काही आमदार, खासदार प्रचंड अस्वस्थ झाले आहेत. महाराष्ट्रातल्या जनतेने आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस ऐवजी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला कौल दिला. ८ व ९ जानेवारीला होणाऱ्या पक्षाच्या बैठकीत सत्तेसोबत जाण्याचा निर्णय पक्षाने घ्यावा यासाठी आग्रही भूमिका मांडण्याचे नियोजन त्यांनी केले आहे.
सध्या अस्तित्वात असलेला आपला पक्ष अजित पवारांच्या (Ajit Pawar) पक्षात विलीन करून एकच राष्ट्रवादी जोमाने वाढवावी अशीही त्यांची भूमिका आहे. त्यावर शरद पवार, सुप्रिया सुळे काय भूमिका घेतात, यावर पुढील घडामोडी ठरणार आहेत.
(हेही वाचा – Sports Calendar 2025 : चॅम्पियन्स करंडक, महिला विश्वचषक आणि फिफा क्लब फुटबॉल विश्वचषक, नवीन वर्षातील क्रीडा मेजवानी)
इतिहासाची होऊ शकते पुनरावृत्ती
सत्तेपुढे शरणागती पत्करण्याचा वसा शरद पवारांचे राजकीय गुरू यशवंतराव चव्हाण यांनीच पवारांना दिला. स्वतः यशवंतरावांनी १९८० मध्ये सुरुवातीला स्वाभिमान दाखवून स्वतंत्रपणे लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवल्या होत्या, पण इंदिरा गांधींच्या काँग्रेसपुढे हरल्यानंतर त्यांनी इंदिरा गांधीपुढेच शरणागती पत्करली होती. जनतेने कौल देऊन इंदिरा गांधींची काँग्रेस खरी ठरवली आहे. त्यामुळे आपण काँग्रेसच्या मुख्य प्रवाहात जात आहोत, असे सांगून यशवंतरावने त्यावेळी आपल्या शरणागतीला वैचारिक मुलामा चढाविला होता.
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार आणि खासदारांनी यशवंतरावांचीच “री” ओढत अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादीला जनतेने कौल दिल्याचा दाखला देत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन व्हावे, असा प्रस्ताव दिल्याची बातमी समोर आली आहे.
सत्ता नसल्याने पुढील ५ वर्षे मतदारसंघातील विकासकामे होणार नाहीत. मग पुढच्या निवडणुकीला सामोरे कसे जायचे, हा प्रश्न या नेत्यांना सतावतो आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण करावे आणि संघटन अधिक मजबूत करून पुढची वाटचाल करावी, असे बहुतेकांचे मत आहे. जितेंद्र आव्हाड, राेहित पाटील आणि उत्तम जानकर या तिघांचा मात्र या प्रस्तावाला विरोध आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली या राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व कायम ठेवावे आणि विरोधी पक्षाची भूमिका बजावावी, असे त्यांना वाटत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
(हेही वाचा – ICC Test Championship : कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी द्विस्तरीय कसोटी मालिका हव्यात – रवी शास्त्री)
३ आमदारांचा विरोध
लोकसभेत पवारांचे ९ खासदार आहेत, तर विधानसभेत १० आमदार आहेत. हे सगळेजण अजित पवारांच्या (Ajit Pawar) सत्तेच्या वळचणीला जायला उत्सुक आहेत. फक्त जितेंद्र आव्हाड, रोहित पाटील आणि उत्तम जानकर या ३ आमदारांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पुढे शरणागती पत्करायला विरोध असल्याचे सांगितले जात आहे, पण कर्जत जामखेड म्हणून निसटता विजय झाल्यानंतर रोहित पवारांचा अजितदारांपुढे शरणागती पत्करण्याचा आग्रह सुरू झाला आहे.
आता खासदार सुप्रिया सुळे यांना राजी केले की अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा मार्ग मोकळा होईल. मात्र, या परिस्थितीत बहुमतापुढे मान तुकवून स्वतः शरद पवार संघटनेपासून बाजूला होतील असे सांगण्यात येत आहे. भाजपा बरोबर जाणे इष्ट नाही, अशी “वैचारिक” भूमिका घेऊन ते विरोधकांच्या आघाडीत राहण्याची शक्यता बोलून दाखवली जात आहे. परंतु पवारांचा निवृत्तीचा आतापर्यंतचा अनुभव लक्षात घेता, ते संघटनेपासून बाजूला होऊन नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना “मोकळेपणाने” सत्तेच्या वळचणीला जाऊ देतील, ही शक्यता फार कमी आहे. हा सगळा राजकीय खटाटोप ते छुप्या मार्गानेच “डाव” टाकत करण्याची दाट शक्यता आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community