२००४ मध्ये राष्ट्रवादीने मुख्यमंत्री पद सोडणे मोठी चूक; अजित पवार यांचे विधान

128
२००४ साली राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष होता, तेव्हा आमच्या वरिष्ठांनी पक्षातील कुणालाही मुख्यमंत्री बनवले असते तरी चालले असते, पण तसे घडले नाही, ही सर्वात मोठी चूक ठरली, असे विधान राष्ट्रवादीचे नेते, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले. एका विशेष मुलाखतीत ते बोलत होते.

काय म्हणाले अजित पवार?

२००४ साली आर आर पाटील, छगन भुजबळ यांना मुख्यमंत्री करायचे होते किंवा आमच्या वरिष्ठांच्या मनात कोण होते त्यांना मुख्यमंत्री करायचे होते. २००४ ला जर मुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीकडे आले असते, तर शेवटपर्यंत बदल होऊ दिला नसता, असे अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले. आम्ही तेव्हा ज्युनियर होतो. निर्णय प्रक्रियेमध्ये बोलणारे प्रफुल्ल पटेल, मधुकर पिचड, छगन भुजबळ, पद्मसिंह पाटील, विजयसिंह मोहिते पाटील हे आमचे नेतेगण होते. त्यांनी सांगायचे आणि आम्ही जी म्हणायचे, अशी परिस्थिती होती, असे सांगत आपण कितीही काही म्हटले तरी प्रयत्न करणे हे प्रत्येकाच्या हातात असते, पण कुठेतरी नशिबाची पण साथ लागते. सगळ्याच क्षेत्रात ती लागते. देशातही पंतप्रधानपदाच्या योग्यतेची अनेक माणसे होती, पण सगळ्यांनाच ते पद मिळते का? अगदी महापौरपद असेल, मुख्यमंत्रिपद असेल, किंवा आणखी कुठले पद असेल, सगळ्याच ठिकाणी असे होते, असेही अजित पवार म्हणाले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.