मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्याच राज्य सरकारला अल्टिमेटम दिल्यानंतर त्यांच्यावर महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावरुन पुन्हा एकदा राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. राज ठाकरे यांची सर्व आंदोलनांनी आजवर राज्याचे नुकसान केल्याची टीका त्यांनी केली आहे.
(हेही वाचाः कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेचा मनसेला दणका)
काय म्हणाले पवार?
राज ठाकरे यांनी राज्यातील टोल नाक्यांविरुद्ध याआधी आंदोलन छेडले होते. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. टोल बंद झाले तर राज्यातील महामार्गांचा विकास होणं अवघड आहे. टोल घेतल्यामुळेच आज महामार्गांचे जाळे विस्तारल्याचे स्वतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले आहे. त्यामुळे राज ठाकरे यांची आंदोलने ही राज्याचे आणि समाजाचे नुकसान करणारी आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे.
राज ठाकरेंची अयशस्वी आंदोलने
उत्तर भारतीयांविरुद्ध केलेल्या आंदोलनांमुळे सर्व महत्वाच्या शहरांतील बांधकामाची कामं बंद झाली. कारण बांधकाम क्षेत्रात उत्तर भारतीय कामगार काम करतात. त्यामुळे या क्षेत्रातील सर्व कामे ठप्प झाली, त्यानंतर त्यांना पुन्हा बोलवावे लागले आणि राज ठाकरे यांचे हे आंदोलन वाया गेले. तसेच राज ठाकरे यांचे फेरीवाल्यांविरुद्धचे आंदोलन देखील असेच अयशस्वी झाल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.
(हेही वाचाः राज ठाकरेंची सभा झालेली जागा ‘या’ खेळासाठी आहे प्रसिद्ध)
Join Our WhatsApp Community