Ajit Pawar-Supriya Sule : अजित पवार-सुप्रिया सुळे एकाच कार्यक्रमात समोरासमोर; व्यासपिठावरच झाला सवाल-जवाब

243
Ajit Pawar-Supriya Sule : अजित पवार-सुप्रिया सुळे एकाच कार्यक्रमात समोरासमोर; व्यासपिठावरच झाला सवाल-जवाब
Ajit Pawar-Supriya Sule : अजित पवार-सुप्रिया सुळे एकाच कार्यक्रमात समोरासमोर; व्यासपिठावरच झाला सवाल-जवाब

पुण्यात (Pune) १० मार्च रोजी महापालिकेच्या मल्टिस्पेशालिटी हीलिंग हॉस्पिटलच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे एकाच व्यासपिठावर आल्याचे पहायला मिळाले. या वेळी या दोघांनी एकमेकांशी थेट बोलणे टाळले; मात्र व्यासपिठावरूनच एकमेकांना सवाल-जबाव केले. (Ajit Pawar-Supriya Sule)

(हेही वाचा – Mangesh Padgaonkar : प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, हा प्रेमाचा संदेश देणारे मंगेश पाडगावकर)

पुण्यात झालेल्या या कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळेंना आधी भाषणासाठी पाचारण करण्यात आले. या वेळी सुप्रिया सुळेंनी व्यासपिठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार असतानाच रखडलेल्या पालिका निवडणुकांचा मुद्दा उपस्थित केला. “माझी राज्य सरकारकडे मागणी आहे. इथे अनेक दिवस नगरसेवक नाहीयेत. गेल्या दोन-अडीच वर्षांत इथे निवडणूक न झाल्यामुळे या भागातल्या जनतेनं कुणाकडे प्रश्न मांडावेत? हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. सत्तेचं विकेंद्रीकरण करण्यासाठी नगरसेवकाची भूमिका फार महत्त्वाची असते. त्यामुळे नगरसेवकांची निवडणूक आपण लवकरात लवकर घेतली, तर या भागातल्या लोकांना मोठा आधार मिळेल”, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.

सर्वोच्च न्यायालयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका थांबल्या 

सुप्रिया सुळे यांच्यानंतर भाषणासाठी आलेले अजित पवार यांनी मात्र त्यांच्या भाषणात सुरुवातीलाच त्यांच्या मागणीला उत्तर दिले. अजित पवार म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्य सरकारमुळे नसून सर्वोच्च न्यायालयामुळे थांबल्या आहेत. दोन वर्षांपेक्षा जास्त काळ महानगर पालिकेच्या निवडणुका थांबलेल्या आहेत. पण त्या सर्वोच्च न्यायालयामुळे थांबल्या आहेत. आम्हीही लोकांमधून निवडून आलेले कार्यकर्ते आहोत. वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी, असे आम्हालाही वाटते. सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणासंदर्भातला एक मुद्दा गेला आहे. त्याचा निकाल लवकर लागत नाही. राज्य सरकार सातत्याने त्यासाठी प्रयत्न करत आहे. त्याची तारीख लागावी आणि लवकरात लवकर या निवडणुका व्हाव्यात, याच मताचे महायुतीचे सरकार आहे, याची कृपया नोंद आपण सर्व सहकाऱ्यांनी घ्यावी, असे अजित पवार या वेळी म्हणाले. (Ajit Pawar-Supriya Sule)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.