Ajit Pawar प्रत्येक तीन जिल्ह्यांसाठी एक संपर्क मंत्री नेमणार

47
Ajit Pawar प्रत्येक तीन जिल्ह्यांसाठी एक संपर्क मंत्री नेमणार
Ajit Pawar प्रत्येक तीन जिल्ह्यांसाठी एक संपर्क मंत्री नेमणार
  • मुंबई प्रतिनिधी

भाजपा आणि शिवसेनेच्या धर्तीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार (Ajit Pawar) गटानेही पक्ष बळकटीसाठी नवा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या संघटनेला मजबुती देण्यासाठी प्रत्येक तीन जिल्ह्यांसाठी एक संपर्क मंत्री नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या संपर्क मंत्र्यांची मुख्य जबाबदारी पक्ष संघटन मजबूत करणे आणि महायुतीमध्ये समन्वय राखणे अशी असणार आहे. तसेच, स्थानिक कार्यकर्त्यांच्या अडचणी सोडवणे, त्यांच्या कामाला महत्त्व देणे आणि त्यांना बळकटी देणे हेही यामागील उद्दिष्ट आहे. संपर्क मंत्र्यांमुळे पक्षाची गटपातळीवरील सुसूत्रता वाढेल, असे पक्षाचे मत आहे.

(हेही वाचा – Cyber ​​Crime : राज्यात सायबर गुन्हेगारांची संख्या वाढली; वर्षभरात सात हजार कोटींची सायबर लूट)

येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाचे संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. संपर्क मंत्री कार्यकर्त्यांसोबत थेट संवाद साधून पक्षाच्या धोरणांची अंमलबजावणी करतील. त्यामुळे पक्षाला स्थानिक पातळीवर अधिक बळकटी मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

भाजपा (BJP) आणि शिवसेनेप्रमाणेच (Shiv Sena) राष्ट्रवादी काँग्रेसनेही (NCP) हा निर्णय घेतल्याने राज्याच्या राजकारणात नवा राजकीय तडका पाहायला मिळणार आहे. आता हे संपर्क मंत्री पक्ष बळकटीसाठी किती प्रभावी ठरतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.