अजित पवार यांना पुढचे मुख्यमंत्री करण्यासाठी कामाला लागा, असे आवाहन आमदार निलेश लंके यांनी राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना केले आहे. निलेश लेंकेंच्या या विधानाने आता चर्चांना उधाण आले आहे. जनतेमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे. त्यामुळे पुढचे सरकार महाविकास आघाडीचेचे सरकार असणार आहे. राज्याचे पुढेच मुख्यमंत्री राष्ट्रवादी काॅंग्रेसचेच असणार आहेत, असे वक्तव्य निलेश लंके यांनी यावेळी केले आहे.
आतापर्यंत मविआतील तीनही पक्षांनी विधानसभा निवडणुका सोबतच लढण्याच्या आपल्या भूमिकेत कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे जर अजित पवारांना मुख्यमंत्री करायचे असेल, तर संपूर्ण मविआचेच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार ठरु शकतील. यामुळे मविआचा मुख्यमंत्रीपदाचा पुढचा उमेदवार ठरल्याची जोरदार चर्चा आहे.
( हेही वाचा: अधिवेशनापूर्वी राज्याच्या राजकारणात होणार मोठी उलथापालथ; बच्चू कडूंच्या विधानाने खळबळ )
काय म्हणाले निलेश लंके?
आपल्याला दादांना मुख्यमंत्री करायचे आहे, त्यासाठी आतापर्यंत कामाला लागा, असे आवाहन लेंकेंनी कार्यकर्त्यांना केले आहे. त्यामुळे आता राष्ट्रावादीत दोन गट निर्माण झाले की काय? अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्याला कारण देखील तसेच आहे, काही दिवसांपूर्वी बोलत असताना सुप्रिया सुळे यांना मोठे वक्तव्य केले होते. आजकाल माझे वडिल चोरण्याची पद्धत सुरु आहे. पण माझे वडील माझेच आहेत, अशा आशयाचे वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केले होते. त्यामुळे आता राष्ट्रवादीत नेमके चाललेय काय? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
Join Our WhatsApp Community