राज्य सरकारी बॅंकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी पुन्हा चौकशी होण्याची शक्यता आहे. याप्रकरणी विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह 76 संचालकांची पुन्हा चौकशी होण्याची शक्यता आहे. क्लोजर रिपोर्टनंतर अनेक जनहीत याचिका दाखल करण्यात आल्या असून, सातत्याने पुन्हा चौकशी करण्याची मागणी केली जात होती. त्यामुळेच, अजित पवार आणि 76 संचालकांसह पुन्हा ईडी चौकशी होऊ शकते.
अजित पवार आणि शरद पवार यांच्या भूमिकेची चौकशी करा
राज्य सहकारी बॅंकेच्या 25 हजार कोटींच्या घोटाळ्याची ईडीमार्फत पुन्हा चौकशी होण्याची शक्यता आहे. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात झालेल्या चौकशीचे प्रकरण पुन्हा रडारवर येण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी सरकारने दाखल केलेल्या क्लोजर रिपोर्टनंतर अनेक जनहित याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या याचिकांमधून पुन्हा चौकशी करण्याची मागणी सातत्याने केली जात होती. या याचिकांना उत्तर देताना, आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयाला पुन्हा चौकशी करण्यासंदर्भात लेखी पत्रक लिहून कळवले आहे. या याचिकांमध्ये अजित पवार आणि शरद पवार यांच्या भूमिकेची चौकशी करण्याचीही मागणी करण्यात आली होती.
( हेही वाचा: आमच्या धार्मिक भावना दुखावण्याचा अधिकार कोणी दिला? )
Join Our WhatsApp Community