Ajit Pawar काश्मीरमध्ये निवडणूक लढणार; विधानसभेच्या ९० जागांसाठी उमेदवारांचा शोध सुरु

सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबरपूर्वी निवडणूक घेण्याचा आदेश दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) राष्ट्रीय महासचिव आणि मुख्य प्रवक्ते ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी "हिंदुस्थान पोस्ट"शी बोलताना सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने जम्मू-काश्मीर विधानसभेची निवडणूक ३० सप्टेंबर २०२४ पूर्वी घेण्याचे आदेश दिले आहेत.

279
Election Commission of India च्या निकालाने विधानसभा अध्यक्षांचे काम सोपे, अजित पवार गट मजबूत
  • वंदना बर्वे

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जम्मू-काश्मीरतील विधानसभा निवडणूक (Assembly Elections) लढविण्याची जय्यत तयारी करीत आहे. सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबरपूर्वी निवडणूक घेण्याचा आदेश दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) राष्ट्रीय महासचिव आणि मुख्य प्रवक्ते ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी “हिंदुस्थान पोस्ट”शी बोलताना सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) जम्मू-काश्मीर विधानसभेची निवडणूक ३० सप्टेंबर २०२४ पूर्वी घेण्याचे आदेश दिले आहेत. (Ajit Pawar)

जम्मू-काश्मीरतील कलम ३७० हटविण्याच्या केंद्र सरकारच्या (Central Govt) निर्णयाला आव्हान देण्यात आले होते. यावर निकाल देताना भारताचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी निवडणूक आयोगाला (EC) जम्मू आणि काश्मीर विधानसभेच्या निवडणुका (Assembly Elections) ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत घेण्यासाठी पावले उचलण्याचे निर्देश दिले. कलम ३७० रद्द करण्याच्या विरोधात निकाल देताना भारताचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड म्हणाले की, पाच न्यायाधीशांचे तीन वेगवेगळे निर्णय आहेत. या तीन निर्णयांवर सर्वांचे एकमत आहे. सरन्यायाधीश म्हणाले की, महाराजा हरि सिंह यांनी भारतासोबत विलीनीकरणाचा करार केला तेव्हा जम्मू-काश्मीरचे सार्वभौमत्व संपले होते. ते भारताच्या अधीन झाले. जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Ajit Pawar)

(हेही वाचा – Make Sure Gandhi Is Dead : रणजित सावरकर लिखित ‘मेक शुअर गांधी इज डेड’ पुस्तक जगद्गुरू शंकराचार्य सदानंद सरस्वती महाराज यांना दिले भेट)

सद्या सर्व ९० जागांची तयारी करीत आहोत – श्रीवास्तव

भारतीय राज्यघटना जम्मू-काश्मीरच्या राज्यघटनेपेक्षा श्रेष्ठ आहे. कलम ३७० ही तात्पुरती व्यवस्था होती. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) सक्रिय  झाले आहेत. त्यांनी ब्रिजमोहन श्रीवास्तव यांना काश्मीरचा प्रभाव देत तेथे निवडणुकीची तयारी करण्यास सांगितले आहे. श्रीवास्तव यांनी सांगितले की, जम्मू-काश्मीरचे जम्मू, काश्मीर आणि लेह-लडाख अशा तीन भागात विभाजन झाले होते. यानंतर केंद्र सरकारने (Central Govt) जम्मू-काश्मीर मिळून एक केंद्रशासित प्रदेश बनविला आणि लेह-लडाख एक केंद्रशासित प्रदेश बनविला. (Ajit Pawar)

आता जम्मू-काश्मीरमध्ये २० जिल्ह्यांचा समावेश असून येथे विधानसभेच्या ९० जागा आहेत. या सर्व जागांवर उमेदवार उतरविण्याची पक्षाची तयारी आहे. मुळात, या भागात ११४ जागा आहेत. मात्र २४ जागा या पाकव्याप्त काश्मीरमध्ये येतात. यामुळे या जागांवर निवडणूक घेता येणार नाही. राका रालोआचा घटक आहे. अशात निवडणुकीपूर्वी भाजपाशी आघाडी झाली तर जागांची वाटाघाटी करता येईल. परंतु सद्या सर्व ९० जागांची तयारी करीत आहोत असे श्रीवास्तव यांनी सांगितलं. (Ajit Pawar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.