राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची सोमवारी ईडी अधिकाऱ्यांनी कसून चौकशी केली. तब्बल नऊ तास जयंत पाटलांची चौकशी करण्यात आली. ही चौकशी संपल्यानंतर जयंत पाटलांची विचारपूस करण्यासाठी राज्यातील सगळ्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी फोन केले. पण अजित पवारांनी केला नसल्याचे जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितले. पण यावरून ईडीच्या लढाईत जयंत पाटील एकाकी पडल्याच्या चर्चांणा अधिक उधाण आले आहे. अशातच आता जयंत पाटलांना फोन का केला नाही?, याच स्पष्टीकरण अजित पवारांनी दिले आहे.
(हेही वाचा – नऊ तासांच्या ईडी चौकशीनंतर सगळ्या प्रमुख नेत्यांचा फोन, पण अजित पवारांना नाही; जयंत पाटील एकाकी पडल्याच्या चर्चांणा उधाण)
काय म्हणाले अजित पवार?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणखी काही नेत्यांचीही ईडी चौकशी झाली. आमचे नेते छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल यांची ईडी चौकशी झाली, तेव्हाही मी फोन केला नाही. मला वाटते की, फोन करण्यापेक्षा प्रत्यक्ष भेट घेऊन या गोष्टींची चर्चा केली पाहिजे, असे अजित पवार म्हणाले.
‘आयएल अँड एफएस’ समूहाने कोहिनूर सीटीएनएल या टॉवरसाठी कर्ज दिले होते. पण या व्यवहारामध्ये गैरव्यवहार झाल्याच संशय ईडीला आला आणि याप्रकरणाशी जयंत पाटील यांचा संबंध आहे का नाही, हे तपासण्यासाठी ईडीने पाटील यांना चौकशीला बोलावले होते. सोमवारी तब्बल नऊ तासांच्या चौकशीनंतर जयंत पाटील रात्री साडे नऊच्या दरम्यान ईडी कार्यालया बाहेर आले आणि राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये गेले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community