Ajit Pawar : “…तर मी कोणाच्या बापाच ऐकत नाही”, अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

207
Ajit Pawar : "...तर मी कोणाच्या बापाच ऐकत नाही", अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या प्रचार सभेमध्ये बोलत असताना आपली स्पष्ट भुमिका मांडली. ते म्हणाले, “काहींनी उमेदवार म्हणून येताना वल्गना केल्या की, जर आम्ही एमआयडीसी (MIDC) आणली नाही, तर २०१९ मध्ये पुन्हा मतं मागायला येणार नाही. पण ते मतं मागायला आले. तुम्ही निवडून दिलं. भावनिक होऊ नका. तुमच्या रोजी-रोटीची ही निवडणूक आहे. पुढच भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. तुम्ही म्हणाल, मग अजित पवार तुम्ही काय करणार? मी माझ्या इथे काम करुन आलोय. बारामतीचा चेहरा-मोहरा बदलालय.” असं अजित पवार म्हणाले. (Ajit Pawar)

(हेही वाचा – Mumbai Crime : दोन भावंडांच्या मृत्यूनंतर बेवारस उभी असलेली वाहने मनपा आणि वाहतूक पोलिसांच्या रडारवर)

नेमकं काय म्हणाले अजित पवार ?

“मला विकास करायचा अनुभव आहे. रात्री १ ला झोपलो, तरी ६ वाजता उठून काम करतो. मुंबई, पुणे, बारामती जिथे कुठे असेन, तिथे पाचला उठून सहाला कामाला लागतो. मला कामाची, लोकांचे प्रश्न सोडवण्याची, विकासाची आवड आहे. राज्याचं भलं करण्याचा प्रयत्न आहे. आम्ही इतरांसारखे खोटं बोलत नाही. मला निवडून द्या, एमआयडीसी (MIDC) झाली नाही, तर २०१९ मध्ये मत मागायला येणार नाही, मग पुन्हा यायच. मी, जर त्या ठिकाणी असतो, तर मला शरमेने लाज वाटली असती. कुठल्या तोंडाने जाऊ मत मागायला. मी शब्दाचा पक्का आहे. सहजासहजी शब्द देत नाही. शब्द दिला, तर कोणाच्या बापाच ऐकत नाही, तो पूर्ण करतो. मी कामासाठी कठोर आहे. जी कामाची माणस आहेत, त्यांना आपलस करण्याचा सुद्धा प्रयत्न करतो.” असं म्हणत अजित पवार (Ajit Pawar) यांनी विरोधकांवर निशाणा साधला. (Ajit Pawar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.