मुंबई – अजित पवार…राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते. अजित पवार नेहमी चर्चेत असतात ते त्यांच्या आगळ्यावेगळया स्टाईलमुळे. मग तो पहाटे पहाटेचा फडणवीस यांच्यासोबत घेतलेला शपथविधी सोहळा असो किंव्हा अचानक नाराज होऊन आउट ऑफ कव्हरेजमध्ये असलेले अजित दादा असोत. नेहमीच त्यांची चर्चा असते. आज देखील त्यांचे ट्विट असेच चर्चेत आले. आज देखील अजित पवार यांनी सकाळी भारतीय जनसंघाचे सहसंस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करणारं ट्वीट केले होते. मात्र वरिष्ठांनी दम देताच तासाभरातच अजित पवारांनी हे ट्वीट डिलीट केले.
म्हणून दादांचे तासाभरात ट्विट डिलीट
ज्या व्यक्ती हयात नाहीत, त्यांच्याबाबत आपण चांगले बोलतो ही आपली संस्कृती आहे, आपली परंपरा आहे. त्यानुसार मी हे ट्वीट केले होते. परंतु समाजकारण, राजकारण करत असताना वरिष्ठांचे ऐकावे लागते, इतर गोष्टीही असतात असे सांगत तासाभरात का ट्विट डिलीट केले याचे स्पष्टीकरण दिले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याने पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त केले नाही. परंतु अजित पवार यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन अभिवादनाचं ट्वीट केल्याने, त्यांचे भाजपावरील प्रेम कायम असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली. या ट्वीटनंतर दादा रॉक्स, जुन्या आठवणी ताज्या झाल्या, अशा आशयाच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटू लागल्या. त्यानंतर तासाभरातच अजित पवारांच्या ट्विटर हॅण्डलवरुन हे ट्वीट डिलीट केले.
Join Our WhatsApp Community