Ajit Pawar: चंद्रकांत पाटील यांच्या ‘त्या’ विधानावर अजित पवार नाराज, पत्रकार परिषदेत म्हणाले…

राष्ट्रवादीने राज्यात लढवलेल्या ४ पैकी रायगड वगळता ३ जागांवर पराभवाला सामोरं जावं लागलं.

274
NCP : अजितदादांची राष्ट्रवादी परफॉर्मन्समध्ये झिरो; तरीही राष्ट्रवादीच्या नेत्यांचा भाजपालाच इशारा!

लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर शुक्रवारी, (७ जून) राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या शरद पवारांवरील विधानावर नाराजी व्यक्त केली. (Ajit Pawar)

बारामतीत आम्हाला शरद पवारांचा पराभव जास्त महत्त्वाचा असल्याचं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. त्यावर शुक्रवारी, (७ जून) अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत जाहीर नाराजी व्यक्त केली. चंद्रकांत पाटील यांचं ते विधान आपल्याला महागात गेलं. बारामतीत येवून शरद पवारांना पाडू, हे बारामतीकरांना आवडलेलं नाही, अशी जाहीर कबुलीही त्यांनी दिली आहे. (Ajit Pawar)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : ठरलं तर! एनडीएच्या मंत्रिमंडळात ४ खासदारामागे एक कॅबिनेट मंत्रीपद? )

अजित पवारांना मोठा धक्का
बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे यांचा जवळपास दीड लाख मताधिक्यांनी विजय झाला आहे, तर सुनेत्रा पवारांना पराभवाचा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीने राज्यात लढवलेल्या ४ पैकी रायगड वगळता ३ जागांवर पराभवाला सामोरं जावं लागलं. बारामतीचा पराभव अजित पवारांना मोठा धक्का मानला जात आहे; कारण पक्षफुटीनंतर त्यांची ही पहिलीचं निवडणूक होती आणि येत्या काही महिन्यात विधारसभेची निवडणूक होणार आहे. त्या निवडणुकीत याचा परिणाम जाणवू शकतो.

…तरीही जनतेचा कौल स्वीकारावा लागतो
लोकसभा निकालानंतर अजित पवार प्रसारमाध्यमासमोर आले नव्हते. एनडीएच्या दिल्लीतील बैठकीलाही ते गेले नाहीत. दोन दिवसांनंतर त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत त्यांनी लोकसभा निडणुकीच्या निकालावरील विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. त्यात भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांचीही मुद्दा उपस्थित झाला. बारामतीकरांनी आपल्याला भरभरून पाठिंबा दिला. मात्र यावेळी आम्ही कुठे कमी पडलो माहिती नाही. तरीही जनतेचा कौल स्वीकारावा लागतो. विधानसभा निवडणुकीला सामोरं जाण्याचं तयारी सुरू आहे. महायुतीतील प्रमुखाशी चर्चा करणार असल्याचं ते म्हणाले.

‘असं’ बोलणं बारामतीकरांना कधीही आवडणार नाही
बारामतील लोकसभा मतदारसंघात महायुतीने बैठका घेतल्या होत्या. त्यावेळी एका बैठकीत चंद्रकांत पाटील यांनी, शरद पवार यांना बारमतीतून पाडणार आणि राजकारणातून संपवणार, असं वक्तव्य केलं होतं. चंद्रकांत पाटील यांच्या या विधानाचे राज्यात तीव्र पडसाद उमटले. त्यावेळीही अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली होती. पत्रकार परिषदेतही तो मुद्दा उपस्थित झाला. त्यावेळी बारामतीत येऊन शरद पवारांना पाडू, असं बोलणं बारामतीकरांना कधीही आवडणार नसल्याची कबुली त्यांनी दिली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.