Ajit Pawar : अजित पवार होणार मुख्यमंत्री; ११ ऑगस्टला शपथविधी होण्याची शक्यता

291
Ajit Pawar : अजित पवार होणार मुख्यमंत्री; ११ ऑगस्टला शपथविधी होण्याची शक्यता
Ajit Pawar : अजित पवार होणार मुख्यमंत्री; ११ ऑगस्टला शपथविधी होण्याची शक्यता

अजित पवार राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार असल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. एवढेच नव्हे तर ११ ऑगस्टला शपथविधी होणार असल्याचेही समजते. शिवाय Rediff.com या इंग्रजी न्यूज पोर्टलने देखील असा दावा केला आहे. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या १६ आमदारांना अपात्र घोषित ठरतील. त्यानतंर त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचे निर्देश देतील. यामुळे आपसूकच राज्य मंत्रिमंडळ बरखास्त होईल, असे या पोर्टलने सूत्रांचा दाखला देत म्हटले आहे.

अजित पवार संसदेचे पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर येत्या ११ ऑगस्ट रोजी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या आशीर्वादाने दिल्लीत हा फॉर्म्युला ठरवण्यात आला आहे, असे देखील सांगण्यात आले आहे. या दाव्यामुळे अगोदरच अस्वस्थता पसरलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत मोठी खळबळ माजली आहे. एवढेच नाही तर राज्याच्या राजकारणातही मोठी खळबळ माजली आहे.

(हेही वाचा – Ajit Pawar : अजित पवारांनी केली निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल)

एकनाथ शिंदे यांनी २० जून २०२२ रोजी उद्धव ठाकरेंविरुद्ध बंड करून भाजपसोबत सरकार स्थापन केले होते. तत्पूर्वी, अजित पवार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व देवेंद्र फडणवीस यांच्याशी नियमित संपर्कात होते. पण भाजपने अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याची मागणी फेटाळल्यामुळे शेवटच्या क्षणी ही योजना फसली, असा दावा या न्यूज पोर्टलने आपल्या वृत्तात केला आहे. अजित पवार मार्च २०२२ पासून अमित शहांच्या नियमित संपर्कात होते. शिंदेंच्या बंडखोरीपूर्वीच अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी मान्य केली असती, तर त्यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले असते, असेही या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.