Ajit Pawar : बारामती, सातारा, रायगड, आणि शिरूरच्या जागा लढवणारच

पवार विरुद्ध पवार सामना रंगणार

175
Ajit Pawar : बारामती, सातारा, रायगड, आणि शिरूरच्या जागा लढवणारच

राज्याच्या राजकारणात मागील दोन वर्षांच्या कालावधीत अभूतपूर्व अशा घटना घडल्या आहेत. शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पक्षांतर्गत बंड पुकारले. त्यामुळे पक्षात उभी फूट पडली. त्यानंतर राष्ट्रवादी कोणाची, अध्यक्ष कोण? चिन्ह कोणाचं? यांसोबतच आमदार अपात्रता प्रकरणासंदर्भातही अनेक घडामोडी पाहायला मिळत आहेत. अशातच आता आगामी लोकसभा निवडणुकींमध्ये पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार असा संघर्ष पाहायला मिळणार आहे.

महायुतीत लोकसभेच्या चार जागा अजित पवार गट (Ajit Pawar) लढवणार असल्याचे अजित पवार यांनी आज म्हणजेच शुक्रावर १ डिसेंबर रोजी जाहीर केले आहे. बारामती, शिरूर, सातारा, रायगड या जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवणारच आहे, असे अजित पवार यांनी जाहीर केले. सध्या राष्ट्रवादीकडे लोकसभेच्या चार जागा आहेत.

(हेही वाचा – Dutta Dalvi यांना अखेर दिलासा)

नेमकं काय म्हणाले अजित पवार ?

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, “मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभेची आचारसंहिता लागण्याचा अंदाज आहे. लोकसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच आणण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आपल्याला महाराष्ट्रातून एकूण ४८ खासदार निवडून आणायचे आहेत. बारामती, शिरूर, सातारा, रायगड या जागा आपण निवडणारच आहोत.”

पुढे बोलतांना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, “इतर जागांसंदर्भात आपण शिंदे, फडणवीसांशी चर्चा करून लवकरच निर्णय जाहीर करू. जागावाटपासंदर्भात या सगळ्यांशी प्राथमिक चर्चा झाली आहे. आपल्या कार्यकर्त्याची ताकद पाहून आपण त्यांची निवड करणार आहोत.”

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.