Ajit Pawar 10 टक्के मुस्लिम उमेदवार देणार?

214

राज्यातील सर्व राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्यासाठी जागा वाटपावर जोरदार चढाओढ सुरु झाली आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांनी तर या निवडणुकीत १० टक्के मुसलमान उमेदवार देण्याचे ठरवल्याचे समजते. परंतु यामुळे भाजपाच्या गोट्यात नाराजीचा सूर दिसून येऊ लागला आहे.

अजित पवार गटाकडून सध्या विधानसभा मतदारसंघाची चाचपणी केली जात आहे. याबाबत प्राथमिक चर्चेनंतर मुंबईत चार आणि एमएमआर रिजनमध्ये आणखी 1 अशा पाच जागांवर अजित गटाकडून मुस्लीम उमेदवार उभे केले जाणार आहेत.  महायुतीत मुंबईत राष्ट्रवादीला चार जागा सुटणार असल्याची माहिती आहे. या चारही जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुस्लिम उमेदवार देणार आहे. तसेच प्रत्येक प्रादेशिक विभागात एक मुस्लिम उमेदवार देण्याची योजना अजित (Ajit Pawar) गटाने आखली आहे.

(हेही वाचा Tirupati Temple Prasad : प्रसादाच्या लाडूत चरबीचे तेल मिसळणार्‍यांवर तत्काळ गुन्हे दाखल करण्याची मंदिर महासंघाची मागणी)

मुंबईतील कोणत्या जागांवर मुस्लीम उमेदवार?

विधानसभा निवडणुकीत अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून मुंबईतील वांद्रे, मुंबादेवी, अणुशक्ती नगर आणि शिवाजीनगर या मतदारसंघांमध्ये मुस्लीम उमेदवार दिले जाणार आहेत. तर कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघातही मुस्लीम चेहऱ्याची निवड होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अणुशक्ती मतदारसंघातून नवाब मलिक यांची कन्या सना मलिक, शिवाजीनगर मतदारसंघातून नवाब मलिक, वांद्रे पूर्व मतदारसंघातून झिशान सिद्दीकी आणि कळवा-मुंब्रा मतदारसंघातून नाजीम मुल्ला यांना उमेदवारी मिळेल, अशी चर्चा आहे. तर मुंबादेवी मतदारसंघात अजित पवार गटाचा उमेदवार अद्याप निश्चित झालेला नाही.

मुस्लीम समाजाविषयीच्या नितेश राणेंच्या वक्तव्यावर नाराज

गेल्या काही दिवसांपासून नितेश राणे हे मुस्लीम समाजाविषयी वारंवार आक्रमक भाषा वापरत आहेत. यावर अजित पवार (Ajit Pawar) गट प्रचंड नाराज आहे. नितेश राणे यांच्या या वक्तव्याचा विधानसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसू शकतो, असे अजित पवार गटाचे म्हणणे आहे. त्यामुळे अजित पवार गटातील वरिष्ठ नेते नितेश राणे यांच्याविरोधात थेट भाजप पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार असल्याची माहिती समोर आली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.