अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे राज्याचा अर्थसंकल्प (state budget) अर्थमंत्री म्हणून सादर करणार आहेत. नवीन महायुती सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प आहे. तर अर्थमंत्री म्हणून अजित पवारांचा अकरावा अर्थसंकल्प असणार आहे. अर्थसंकल्पाकडे शेतकरी, उद्योजक, व्यापाऱ्यांसह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. (Ajit Pawar)
शेषराव वानखेडेंनंतर (Sheshrao Wankhede) अजित पवार (Ajit Pawar) सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करत आहेत. शेषराव वानखेडे यांच्यानंतर (13 वेळा) अजित पवार (Ajit Pawar) दुसरे सर्वाधिक (11) वेळा अर्थसंकल्प सादर करणारे अर्थमंत्री ठरतील. त्यांच्यानंतर सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा मान जयंत पाटील (10 वेळा) आणि सुशीलकुमार शिंदे (9 वेळा) यांना जातो.
हेही वाचा-Local Body Elections : खासदार हवा, आमदार हवा, मग नगरसेवक का नको?
अजित पवार (Ajit Pawar) हे सोमवार 10 मार्च 2025 रोजी राज्याचा वर्ष 2025-26 चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अजित पवार हे आर्थिक शिस्तीचे कठोर प्रशासक म्हणून ओळखले जातात. जनमताची नाडी ओळखून अर्थसंकल्पात लोकाभिमुख निर्णय जाहीर करताना राज्याच्या विकासप्रक्रियेला धक्का बसणार नाही याची काळजी ते घेत असतात, असं बोललं जातं. विकासयोजनांना निधी उपलब्ध करुन देण्यात तसेच पायाभूत विकासाची प्रक्रिया गतिमान ठेवण्यात ते सातत्याने यशस्वी ठरले आहेत. कोविडच्या संकटकाळात अनेक राज्यांची अर्थव्यवस्था अडचणीत असताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी महाराष्ट्राची आर्थिक शिस्त बिघडू दिली नव्हती, त्याबद्दल त्यांच्या कार्याचा केंद्रीय पातळीवर गौरव झाला आहे. (Ajit Pawar)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community