महाविकास आघाडीचे सरकार असताना मंत्रालयात सातत्याने काम करणारे केवळ अजित पवार हेच होते. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केवळ दोनदाच मंत्रालयात आले होते. कोरोनाच्या काळात जीवाची पर्वा न करता अजित पवार मंत्रालयात काम करत होते, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केली. महायुतीचा जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा अकोला येथे पार पडला. यावेळी ते बोलत होते.
देशात तरुणांना आकर्षित करत असेल आणि आपले राज्य विकासाच्या मार्गाने नेईल, असे कोणते नेतृत्व असेल तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आहे. आमचा नेता जे सांगेल तेच धोरण आणि आमचा नेता जे बांधेल तेच तोरण हीच आमची भूमिका आहे, असेही अमोल मिटकरी (Amol Mitkari) म्हणाले.
(हेही वाचा CM Eknath Shinde : घरात बसणाऱ्यांना लोक निवडणुकीत साफ करतील; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला)
कोणी बापाचा पक्ष चोरला, तर कोणी काकाचा पक्ष चोरला, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले होते. संजय राऊतांच्या या टीकेला आमदार अमोल मिटकरी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत यांचे 3 इंद्रिये निकामी झाले आहेत. मेंदू, जीभ आणि डोळे हे ते इंद्रिय आहेत. पुलोदचे सरकार स्थापन झाले तेव्हा जनसंघाचे लोकही सोबत होते. असा प्रयोग अजित पवार यांनी केला तर कोणाला वाईट वाटण्याचे कारण नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर जेव्हा जेव्हा संकट आले तेव्हा तेव्हा अजित पवार ढाल बनून पुढे गेले. जे पोटात आहे ते त्यांच्या ओठात आहेत, असेही मिटकरी (Amol Mitkari) म्हणाले.
Join Our WhatsApp Community