संपूर्ण जगावर सध्या कोरोनाचं संकट आहे. कोरोनाचा हा महाभयंकर काळ माणूसकी शिकवणारा होता. अनेक चांगल्या-वाईट घटना समोर आल्या. पण यात खरी परीक्षा होती ती माणूसकीची. आरोग्य विभागाच्या अपुऱ्या यंत्रणेमुळे कोरोना रुग्णांच्या जीवाशी खेळ झाल्याच्या अनेक घटनाही समोर आल्या. यावर एका तरुणीची फेसबूक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नाशिकमधली ही घटना आहे.
रश्मी पवार नावाच्या एका तरुणीने फेसबूकवर पालिकेची पोलखोल करणारी एक पोस्ट शेअर केली आहे. सेलिब्रिटी आणि राजकारण्यांना लगेच बेड्स कसे उपलब्ध होतात असा संतत्प सवाल तिने या पोस्टच्या माध्यमातून विचारला आहे. रश्मीच्या वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. वेळेवर बेड न मिळाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. रुग्णालयात उपचार मिळावे यासाठीही वणवण करावी लागली. पण तरीही माणूस वाचला नाही. अशात सेलिब्रिटी आणि राजकारण्यांना लेगस ICU बेड कसे मिळतात असा प्रश्न तिने उपस्थित केला आहे.
रश्मीने तिच्या पोस्टमध्ये पालिकेचा भोंगळा कारभार सांगितला आहे. यावर अनेकांनी पालिकेवर संताप व्यक्त केला आहे. तिची ही पोस्ट सध्या फेसबूकवर प्रचंड व्हायरल होत आहे. खरंतर, बेड वेळवर न मिळण्याची ही काही पहिलीच वेळ नाही आहे. याआधीची असे प्रकार समोर आले आहेत.
महिलेवर रस्त्यावर राहण्याची वेळ
औरंगाबादमध्येही वाळूज परिसरात रुग्णालयात बेड शिल्लक नसल्यामुळे एका महिलेला चक्क रस्त्यावर झाडाखील ऑक्सिजन लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. महिलेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून आरोग्य विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला होता.
Join Our WhatsApp Community