लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana) जानेवारीचा हप्ता कधी मिळणार? असा प्रश्न राज्यातील लाडक्या बहिणींना पडला होता. मात्र, आता लाडकी बहीण योजनेच्या जानेवारीच्या हप्त्याबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. या योजनेबाबत अर्थमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांच्याकडून मोठी अपडेट देण्यात आली आहे. 26 तारखेच्या आत लाडक्या बहिणींचे पैसे जमा होतील असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे. (Ladki Bahin Yojana)
नोकरी करणाऱ्या महिलांचा वेगळा विचार करणार ?
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) कोणत्याही परिस्थिती चालूच राहणार आहे. काळजी करू नका. फक्त त्याचा लाभ गरजू महिलेला मिळाला पाहिजे. जी व्यक्ती श्रीमंत आहे, टॅक्स भरते, नोकरी आहे त्यांच्याबाबत वेगळा विचार करणार आहे. पण ही योजना ज्या माय माऊलीपर्यंत पोहोचायला हवी होती, त्यांच्यापर्यंत ही योजना पोहोचवण्याचं काम महिला आणि बालविकास विभागाने केलं आहे. परवाच या योजनेसाठी 3700 कोटींचा चेक महिला आणि बालविकास खात्याला दिला आहे. 26 तारखेच्या आत लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये या योजनेचा सातवा हाप्ता जमा होईल.” असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. (Ladki Bahin Yojana)
पक्षाची बेरीज झाली पाहिजे
सध्या पक्षात अनेकजण येत आहेत. पक्षाची बेरीज झाली पाहिजे. मात्र, पक्षाला कमीपणा यायला नको. जनमानसात प्रतिमा खराब असलेल्या व्यक्तीला पक्षात स्थान नको. गैरवर्तणूक होता कामा नये अशा सूचनाही अजित पवार यांनी केल्या. चुकीचं काम करणाऱ्यांची हकालपट्टी केली जाईल असंही अजित पवार म्हणाले. (Ladki Bahin Yojana)
निवडणुकीनंतर आपली जबाबदारी वाढली आहे
कधी कधी अपयश येते परंतू ते कायमचे नसते. विधानसभा निवडणुकीनंतर आपली जबाबदारी वाढली आहे. महायुतीला लोकसभेला केवळ 17 जागा मिळाल्या होत्या. मात्र, आता वेगळं चित्र आहे. विधानसभेला आपल्याला चांगलं यश मिळाल्याचे अजित पवार म्हणाले. कोणतही यश अपयश कायम नसतं आपल्याला यात सातत्य ठिकवायच आहे, असेही ते म्हणाले. (Ladki Bahin Yojana)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community