ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यात घेतलेल्या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला होता. “एकतर तू राहशील नाहीतर मी राहीन”, अस म्हणत ठाकरेंनी फडणवीसांना ललकारलं होतं. शिवाय ठाकरेंनी फडणवीसांचा ढेकून म्हणून उल्लेख केला होता. दरम्यान, ठाकरे फडणवीसांच्या वादावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते सांगवी येथील भाषणात बोलत होते.
अजित पवार काय म्हणाले?
अजित पवार (Ajit Pawar)म्हणाले, मी महाराष्ट्र दौऱ्यावर निघालो आहे. मी फक्त विकासाच्या मुद्द्यावर बोलणार आहे. फाफट पसारा सांगणार नाही, पण आता कोण कुणाला ढेकूण म्हणत आहेत. एकमेकांचे कपडे काढायचं बाकी ठेवतात. सत्ताधारी आणि विरोधकांनी लक्ष घालण्याची गरज आहे. पाच ते सहा वेळा एफआरपी वाढला पण MSP वाढला नाही. 40 रुपयापर्यंत साखरेचे दर करून द्या, अशी मागणी आम्ही केली आहे. वाढवणजवळ आम्ही विमानतळ करणार आहोत.
अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, बेरोजगारी कशी कमी होईल यासाठी प्रयत्न करतोय. काही प्रकल्प बाहेर राज्यात जाणार होते ते आम्ही परत आणले. शिक्षणात आम्ही काय बदल करू पाहतोय. काही तज्ज्ञांची नेमणूक केली आहे. शिक्षण घेतल्यावर त्याला त्याचा फायदा होईल असा आमचा प्रयत्न आहे. पाऊस पडतो आहे, मी अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. उजनी धरण 90 टक्के भरले आहे. नदी काठी आम्ही लक्ष देऊन आहोत. लोकांचे कसे नुकसान होणार नाही याची खबरदारी घेतो. डॉक्टर आणि कर्मचारी यांचे हे निवासस्थान इथे होणार आहे. खूप मोठा निधी केंद्र आणि राज्य सरकार कडून आणतो आहे.
Join Our WhatsApp Community