युगेंद्र पवारांच्या आव्हानावर Ajit Pawar यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले… 

96

लोकसभा निवडणुकीवर सर्व राज्यांचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात विधानसभेलाही हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळणार आहे. नणंद भावजय नंतर आता बारामतीत काका-पुतण्याची लढाई रंगणार आहे. युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने तिकिट दिलं आहे. तर अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लढणार आहेत. बारामतीमध्ये होणाऱ्या या विधानसभा लढतीबाबत (Assembly Election 2024) बोलताना अजित पवार यांनी महत्त्वाचे विधान केलं आहे.  (Ajit Pawar)

बारामतीमध्ये (Baramati Assembly) काका विरुद्ध पुतण्या अशी लढत होणार आहे, तर युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे पुत्र आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्राला काका विरुद्ध पुतण्या असा सामना पाहायला मिळणार आहे. अजित पवार यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. कारण लोकसभेला अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला होता. दरम्यान, सुनेत्रा पवार यांना लोकसभा निवडणुकीत उभं करून चूक केली असं विधान देखील अजित  पवार यांनी केले. 

(हेही वाचा – World Wrestling Championship : जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेतून भारताने माघार का घेतली?)

यावेळी पत्रकारांनी त्यांना बारामतीमध्ये काका विरुद्ध पुतण्या अशी लढत होतेय त्यामुळे त्याकडे कसं बघता असं विचारलं. त्यावर बोलताना अजित पवार यांनी तू जसे बघतो आहे तसेच मी बघतो असं मिश्किलपणे उत्तर एका पत्रकाराला दिल्यानंतर हशा पिकला. तसेच अजित पवार पुढे म्हणाले,  की येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, २३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निकालात सर्व चित्र स्पष्ट होईल. तसेच बारामतीकरांना कुणालाही विचारा सहा सात वेळा मला त्यांनी विजयी केलं आहे. महाराष्ट्रातल्या इतर मतदारसंघावर नजर टाका आणि माझ्या मतदारसंघावर नजर टाका जेवढं काही शक्य होतं तेवढं काम मी प्रामाणिकपणे करायचा प्रयत्न केला. मी ज्यावेळी उभा होतो तेव्हा त्यांनी साथ दिली. बारामतीकर माझं घर आहे, ते माझं कुटुंब आहे. मी माझी भूमिका समजून सांगण्याचा प्रयत्न करेन. महाराष्ट्रात फिरताना मी ताठ मानेने फिरेल असा निकाल बारामतीकर देतील,” असा दावा अजित पवार यांनी केला.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.