शरद पवार यांनी बीड पाठोपाठ कोल्हापुरात जाऊन डिवचल्यानंतर त्यांना उत्तर देण्यासाठी अजित पवार गट येत्या १० सप्टेंबरला कोल्हापुरात उत्तरदायित्व सभा घेणार आहे. कोल्हापुरातील तपोवन या सर्वात मोठ्या मैदानावर ही सभा होईल, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी दिली.
राज्याचे विकासाभिमुख उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पिंपरी-चिंचवड, बारामती आणि बीडमध्ये झालेले स्वागत पाहून आम्ही जो विचार घेऊन सत्तेत सहभागी झालो, त्याला जनतेमधून पाठिंबा मिळाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बीडमधील ‘उत्तरदायित्व सभेला’ मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल आम्हाला समाधान आहे. आगामी काळात राज्यव्यापी दौऱ्याचे नियोजन केले जाणार आहे, असेही तटकरे यांनी सांगितले.
(हेही वाचा – Praful Patel : येत्या ३० सप्टेंबरपर्यंत पक्ष आणि चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच मिळणार)
वरळीत महायुतीची बैठक –
३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी राज्यातील महायुती सरकारमध्ये असलेले तीनही पक्ष आणि इतर घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक वरळी डोम, मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जाईल. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील सर्व पक्षांचा समन्वय राखण्यासाठी ही बैठक उपयुक्त ठरेल, असा विश्वासही सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community